गॅरंटी योजना अंमलबजावणी कमिटीकडून आढावा

प्रतिनिधी/ बेळगाव राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पाच गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीचा अहवाल कमिटीचे राज्य व्हा. चेअरमन एस. आर. पाटील यांनी घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी कमिटीच्या पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते. राज्य सरकारकडून गोर-गरिबांसाठी अनेक महत्त्वाकांशी योजना राबविण्यात आल्या आहेत. त्या योजना गोर-गरिबांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत की नाही? याचा आढावा घेण्यात आला. योजनांपासून वंचित असलेल्यांची माहिती […]

गॅरंटी योजना अंमलबजावणी कमिटीकडून आढावा

प्रतिनिधी/ बेळगाव
राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पाच गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीचा अहवाल कमिटीचे राज्य व्हा. चेअरमन एस. आर. पाटील यांनी घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी कमिटीच्या पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते.
राज्य सरकारकडून गोर-गरिबांसाठी अनेक महत्त्वाकांशी योजना राबविण्यात आल्या आहेत. त्या योजना गोर-गरिबांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत की नाही? याचा आढावा घेण्यात आला. योजनांपासून वंचित असलेल्यांची माहिती घेण्यात आली. यावेळी सरकारच्या योजनांचा लाभ सर्वस्तरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी जिल्हा व्हा. चेअरमन मल्लाप्पा मुरगोड, शेखर इती, अमोल बन्ने, बसवराज नाईक, महारुद्र हिरेमठ यांच्यासह तालुका समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.