क्रिकेट पंच इरासमुस यांची निवृत्ती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिकेचे अनुभवी आणि वयस्कर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच मरायस इरासमुस यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंचगिरी क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली आहे. सध्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु असून या मालिकेनंतर ते या क्षेत्रातून निवृत्त होणार आहेत. इरासमुस हे दक्षिण आफ्रिकेचे माजी अष्टपैलू तसेच वेगवान गोलंदाज होते. त्यांनी बोलँड क्लबचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी 2006 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंचगिरी क्षेत्रात पदार्पण केले. इरासमुस यांनी आतापर्यंत 80 कसोटी, 124 वनडे व 43 टी-20 सामन्यात पंचगिरी केली आहे. आयसीसीच्या इलाईट पंच पॅनेलमध्ये ते एक यशस्वी पंच म्हणून ओळखले जातात. 2010 साली त्यांचा आयसीसीच्या इलाईट पंच पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला. 2016, 2017 आणि 2021 साली इरासमुस यांची आयसीसीचे सर्वोत्तम पंच म्हणून निवड करण्यात आली होती.
Home महत्वाची बातमी क्रिकेट पंच इरासमुस यांची निवृत्ती
क्रिकेट पंच इरासमुस यांची निवृत्ती
वृत्तसंस्था /नवी दिल्ली दक्षिण आफ्रिकेचे अनुभवी आणि वयस्कर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच मरायस इरासमुस यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंचगिरी क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली आहे. सध्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु असून या मालिकेनंतर ते या क्षेत्रातून निवृत्त होणार आहेत. इरासमुस हे दक्षिण आफ्रिकेचे माजी अष्टपैलू तसेच वेगवान गोलंदाज होते. त्यांनी बोलँड क्लबचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय […]