बेळगावच्या विमानसेवा पुन्हा सुरू करा

खासदारांची केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडे मागणी बेळगाव : बेळगाव विमानतळावरून अनेक विमानसेवा बंद केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बेळगावमधून इंडिगो व एअरइंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्यांच्या सेवा सुरू करून महत्त्वाच्या शहरांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री के. राममोहन नायडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. विमानसेवा बंद झाल्यामुळे बेळगावच्या औद्योगिक, शैक्षणिक व व्यापारी क्षेत्राचे नुकसान […]

बेळगावच्या विमानसेवा पुन्हा सुरू करा

खासदारांची केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव विमानतळावरून अनेक विमानसेवा बंद केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बेळगावमधून इंडिगो व एअरइंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्यांच्या सेवा सुरू करून महत्त्वाच्या शहरांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री के. राममोहन नायडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. विमानसेवा बंद झाल्यामुळे बेळगावच्या औद्योगिक, शैक्षणिक व व्यापारी क्षेत्राचे नुकसान होत आहे. उडान योजनेचा कालावधी संपल्याने अनेक विमानसेवा बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यासाठी इंडिगो व एअरइंडिया एक्स्प्रेस यासारख्या कंपन्यांनी मुंबई, चेन्नई, सुरत, पुणे अशा सेवा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.