शिवचरित्र वितरणाचा संकल्प
शिवजयंती दिनी उपक्रमाला चालना
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून कंग्राळ गल्ली येथील आकाश हलगेकर या युवकाने शंभर शिवचरित्र वितरित करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. बेळगाव परिसरातील शाळा व ग्रंथालयांना शिवचरित्र भेट दिले जाणार आहे. आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार समजावेत, यासाठी आकाश याने उपक्रम राबविला आहे. सोमवारी शिवाजी उद्यान येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये त्याने महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, महापौर सविता कांबळे, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, उपमहापौर आनंद चव्हाण यांना शिवचरित्र भेट स्वरुपात दिले.
Home महत्वाची बातमी शिवचरित्र वितरणाचा संकल्प
शिवचरित्र वितरणाचा संकल्प
शिवजयंती दिनी उपक्रमाला चालना बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून कंग्राळ गल्ली येथील आकाश हलगेकर या युवकाने शंभर शिवचरित्र वितरित करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. बेळगाव परिसरातील शाळा व ग्रंथालयांना शिवचरित्र भेट दिले जाणार आहे. आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार समजावेत, यासाठी आकाश याने उपक्रम राबविला […]
