सरकारी पत्रांना 24 तासांत उत्तर द्या

जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना बेळगाव : जिल्हा पंचायतीकडे येणाऱ्या प्रकरणांची व नागरिकांच्या समस्यांची तत्काळ दखल घेऊन प्रकरणे निकालात काढावीत. सरकारी पत्रांना 24 तासांत उत्तरे द्यावीत, अशी सूचना जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली. जिल्हा पंचायतीच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. नागरिकांना उत्तम सेवा देणे […]

सरकारी पत्रांना 24 तासांत उत्तर द्या

जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना
बेळगाव : जिल्हा पंचायतीकडे येणाऱ्या प्रकरणांची व नागरिकांच्या समस्यांची तत्काळ दखल घेऊन प्रकरणे निकालात काढावीत. सरकारी पत्रांना 24 तासांत उत्तरे द्यावीत, अशी सूचना जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली. जिल्हा पंचायतीच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. नागरिकांना उत्तम सेवा देणे आवश्यक आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी परिश्रम घ्यावे. सरकारी पातळीवर येणाऱ्या पत्रांचा आणि स्थानिक पत्रांना आद्यक्रम देऊन 24 तासांमध्ये प्रकरणे निकालात काढावीत, अशी कडक सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बैठक घेतली जाईल. या बैठकीला कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे सक्तीचे आहे. तसेच राष्ट्रीय कार्यक्रमांनाही हजर रहावे, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी जिल्हा पंचायत उपकार्यदर्शी, प्रशासकीय उपकार्यदर्शी, योजना अधिकारी, मुख्य लेखाधिकारी, मुख्य योजना अधिकारी, जिल्हा पंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.