अगसगे पीडीओंची त्वरित बदली करा
विकासकामांना खीळ : तालुका पंचायतीला निवेदन
बेळगाव : अगसगे येथील ग्राम विकास अधिकारी (पीडीओ) गैरहजर राहात असल्याने शासकीय कागदपत्रांसाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. तसेच गावच्या विकासाला खीळ बसू लागली आहे. त्यामुळे पीडीओंची तात्काळ इतरत्र बदली करावी, अशा मागणीचे निवेदन अगसगे ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थांनी तालुका पंचायतीचे प्रभारी कार्यकारी अधिकारी एस. के. पाटील यांच्याकडे सुपूर्द केले आहे. अगसगे ग्राम. पं. कार्यक्षेत्रात चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी गावचा समावेश आहे. मात्र ग्राम. पं. कार्यक्षेत्रातील तिन्ही गावच्या विकासकामांवर परिणाम झाला आहे. पीडीओ वेळेत हजर राहत नसल्याने सर्वच कामे खोळंबली आहेत. ग्रामस्थांना शासकीय कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. ग्रामस्थांनी विचारले असता, उडवाउडवीचे उत्तरे दिली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पीडीओच हजर राहात नसल्याने गावचा कारभार डळमळीत
ग्राम. पं. कार्यालयात पीडीओच हजर राहत नसल्याने गावचा कारभार डळमळीत झाला आहे. याबरोबर इतर योजना आणि विकासकामे प्रलंबित आहेत. विविध कामांसाठी केलेले अर्जही प्रलंबित असून, सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करत आहेत. गावच्या विकासकामांमध्येही सदस्यांना सामावून न घेता निर्णय घेतले जात आहे, अशी तक्रार निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी ग्राम. पं. उपाध्यक्षा शोभा कुरेन्नावर, सदस्य भैरू कंग्राळकर, गुंडू कुरेन्नावर, लक्ष्मी सनदी, राजू बाळेकुंद्री, लगमा सनदी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी अगसगे पीडीओंची त्वरित बदली करा
अगसगे पीडीओंची त्वरित बदली करा
विकासकामांना खीळ : तालुका पंचायतीला निवेदन बेळगाव : अगसगे येथील ग्राम विकास अधिकारी (पीडीओ) गैरहजर राहात असल्याने शासकीय कागदपत्रांसाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. तसेच गावच्या विकासाला खीळ बसू लागली आहे. त्यामुळे पीडीओंची तात्काळ इतरत्र बदली करावी, अशा मागणीचे निवेदन अगसगे ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थांनी तालुका पंचायतीचे प्रभारी कार्यकारी अधिकारी एस. के. पाटील यांच्याकडे सुपूर्द केले आहे. अगसगे ग्राम. पं. […]