केळकर बागेतील ‘तो’ रस्ता दुरुस्त करा

बेळगाव : पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. केळकर बाग येथील रामदेव गल्लीकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामध्ये पाणी साचून आहे. त्या रस्त्यावरुन ये-जा करणे अवघड झाले असून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामे करण्यात आली तरी […]

केळकर बागेतील ‘तो’ रस्ता दुरुस्त करा

बेळगाव : पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. केळकर बाग येथील रामदेव गल्लीकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामध्ये पाणी साचून आहे. त्या रस्त्यावरुन ये-जा करणे अवघड झाले असून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामे करण्यात आली तरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अंतर्गत रस्त्यांचे मात्र डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. आता पावसाळा अर्धा अधिक झाला आहे. या रस्त्यावर पाणी साचून आहे. त्यामुळे रस्ता लवकर खराब झाला. साहजिकच वाहनचालकांना वाहने चालविणे अवघड झाले आहे. तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी येथील जनतेची मागणी आहे.