अनमोड रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात
जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याची दखल : मणतुर्गा रेल्वेफाटकाजवळ दुरुस्ती
खानापूर : गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनतेची दैना उडाली आहे. तसेच अनेक पुलांचीही दयनिय अवस्था झाली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी दोन दिवसापूर्वी खानापूर तालुक्याच्या रस्त्यांची आणि पुलांची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते तसेच महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या होत्या. तसेच आवश्यक असलेल्या ठिकाणी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, असे आदेश दिले होते. याची दखल घेत अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा रेल्वेफाटकाजवळील पर्यायी मार्गाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून सार्वजनिक बांधकाम खाते काही ठिकाणी रस्ते बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जे रस्ते तात्पुरती डागडुजी होऊन वाहतुकीस सुरळीत होतील, अशा रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्यात यावी, असे आदेश दिले होते. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी राजेंद्र होनकांडे यांनी मणतुर्गाजवळील रेल्वेफाटकाच्या बाजूने पर्यायी मार्गावर खडी टाकून रस्ता दुरुस्तीस सुरुवात केली आहे. रेल्वे प्रशासनाकडून खडी टाकून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
हलात्री पुलासाठी 7 कोटीचा आराखडा
खानापूर-अनमोड रस्त्यावर असलेल्या हलात्री नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने मोठा पाऊस झाल्यास या रस्त्यावरील वाहतूक बंद होते. आणि या भागातील 40 गावांचा संपर्क खानापूरशी तुटतो. त्यामुळे या पुलाची उंची वाढवण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी करून उंची वाढवण्यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशा सूचना केल्या होत्या. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाची उंची वाढवण्यासाठी आराखडा तयार केला असून 7 कोटी रुपये खर्चाचा आराखडा शासनाकडे पाठविण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते राजेंद्र होनकांडे यांनी ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’शी बोलताना सांगितले.
Home महत्वाची बातमी अनमोड रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात
अनमोड रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात
जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याची दखल : मणतुर्गा रेल्वेफाटकाजवळ दुरुस्ती खानापूर : गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनतेची दैना उडाली आहे. तसेच अनेक पुलांचीही दयनिय अवस्था झाली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी दोन दिवसापूर्वी खानापूर तालुक्याच्या रस्त्यांची आणि पुलांची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते तसेच महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या होत्या. तसेच आवश्यक […]