फुलबाग गल्ली परिसरातील ड्रेनेज चेंबर दुरुस्त करा
महापालिकेच्या अभियंत्याला निवेदन
बेळगाव : शहरातील फुलबाग गल्ली परिसरात ड्रेनेजचे चेंबर ब्लॉक होऊन ते पाणी विहिरींना मिश्रित होत आहे. याचबरोबर नळालाही दूषित पाणी येत आहे. तेव्हा तातडीने ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी महापालिका बांधकाम खात्याच्या अभियंत्यांकडे करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेजचे पाणी विहिरींना मिसळत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. याबाबत यापूर्वीच निवेदन देण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे पुन्हा नारायण सावंत, सुनील जाधव यांनी हे निवेदन दिले असून, तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. फुलबाग गल्लीसह पाटील गल्ली व इतर परिसरातही हे दूषित पाणी येत आहे. त्यामुळे अनेक जण साथीच्या आजारांनी त्रस्त झाले आहेत. निवेदन दिल्यानंतर महापालिकेचे अधिकारी सोमवारी तातडीने दाखल झाले. त्यांनी पाहणी केली. दुरुस्ती करू, असे आश्वासन दिले आहे. मात्र आश्वासन नको तर तातडीने त्याची दुरुस्ती करा, अशी मागणी करण्यात आली.
Home महत्वाची बातमी फुलबाग गल्ली परिसरातील ड्रेनेज चेंबर दुरुस्त करा
फुलबाग गल्ली परिसरातील ड्रेनेज चेंबर दुरुस्त करा
महापालिकेच्या अभियंत्याला निवेदन बेळगाव : शहरातील फुलबाग गल्ली परिसरात ड्रेनेजचे चेंबर ब्लॉक होऊन ते पाणी विहिरींना मिश्रित होत आहे. याचबरोबर नळालाही दूषित पाणी येत आहे. तेव्हा तातडीने ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी महापालिका बांधकाम खात्याच्या अभियंत्यांकडे करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेजचे पाणी विहिरींना मिसळत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. याबाबत […]