‘दीननदयाळ’ कार्डचे नूतनीकरण आजपासून

तीन लाखपेक्षा जास्त कार्डे होणार नुतनीकृत : ऑनलाईन नूतनीकरणाचीही सेवा उपलब्ध पणजी : राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा कवच प्रदान करणाऱ्या दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेच्या लाभधारकांचे कार्ड नूतनीकृत करण्याची मोहीम आज दि. 4 मार्च पासून प्रारंभ होत आहे. त्याअंतर्गत 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीसाठी प्रत्येकाला विमा कवच प्राप्त होणार आहे. सार्वजनिक […]

‘दीननदयाळ’ कार्डचे नूतनीकरण आजपासून

तीन लाखपेक्षा जास्त कार्डे होणार नुतनीकृत : ऑनलाईन नूतनीकरणाचीही सेवा उपलब्ध
पणजी : राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा कवच प्रदान करणाऱ्या दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेच्या लाभधारकांचे कार्ड नूतनीकृत करण्याची मोहीम आज दि. 4 मार्च पासून प्रारंभ होत आहे. त्याअंतर्गत 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीसाठी प्रत्येकाला विमा कवच प्राप्त होणार आहे. सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे अंमलबजावणी होणाऱ्या या योजनेंतर्गत आतापर्यंत तीन लाखपेक्षा जास्त कार्डे जारी करण्यात आली आहेत. त्याद्वारे सुमारे 10 लाख लोकांना लाभ मिळाला आहे. आता यंदाच्या कार्डांची मुदत 31 मार्च रोजी संपुष्टात येणार असून त्यानंतर 1 एप्रिलनंतर एखाद्यास केव्हाही ऊग्णालयात जावे लागल्यास नूतनीकृत कार्डच अनिवार्य राहणार आहे. लाभधारकांना नूतनीकरणासाठी जवळच्या डीडीएसएसवाय केंद्रावर सेवा उपलब्ध असेल. त्याशिवाय आता ऑनलाईन पद्धतीनेही स्वत:हून नूतनीकरण करता येणार आहे. केंद्रावर जाऊन नूतनीकरण करणाऱ्यांनी सोबत विद्यमान डीडीएसएसवाय कार्ड, आधारकार्ड आणि नूतनीकरणाची फी नेणे आवश्यक आहे.
ऑनलाईन नुतनीकरण करण्यासाठी गोवाऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर लॉगईन करावे लागणार आहे. त्यानंतर सेवा – डायरेक्टोरेट ऑफ हॅल्थ सर्विसेस – दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना – रिनीवल असे एकेक पर्याय क्लीक करत जावे. तेथून पुढे सर्विसेस टाईप – रिनीवल ऑर रिनीवल अपडेशन या पर्यायांची निवड करावी. त्यानंतर आपला डीडीएसएसवाय कार्ड क्रमांक एंटर करून जनरेट पर्यायावर क्लीक करावे आणि ओटीपी व्हेलिडेट करावा. त्यानंतर क्रीनवरील तपशीलाची छाननी करून पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करावी. यशस्वी पेमेंटनंतर पावती जनरेट होऊन नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण होईल. कुटुंबात एक ते तीन पर्यंत सदस्य असलेल्या कार्डधारकांना ऊ. 200 आणि चार किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असलेल्या कुटुंबासाठी ऊ. 300 असे वार्षिक नूतनीकरण शुल्क भरावे लागणार आहे. त्याशिवाय ओबीसी, एससी, एसटी आणि शारीरिक अपंग व्यक्तींसाठी त्यांनी वैध दस्तावेज सादर केल्यानंतर शुल्कामध्ये 50 टक्के सवलत प्राप्त होणार आहे. कार्डवर नवीन सदस्याची नोंदणी, नाव गाळणे, तपशीलात दुऊस्ती किंवा कार्ड हरवल्यास डुप्लिकेट कार्ड मिळविणे आदी सुविधांसाठी लाभधारकांना जवळच्या डीडीएसएसवाय केंद्रावर भेट द्यावी लागणार आहे. यासंबंधी कोणतीही शंका, स्पष्टीकरण किंवा अधिक माहितीसाठी 888298800 या क्रमांकावर कॉल सेंटरशी संपर्क करण्याचा पर्यायही उपलब्ध करण्यात आला आहे.