कुद्रेमनी रस्त्यावर पडलेले झाड हटविले
वार्ताहर/कुद्रेमनी
ग्राम पंचायत सदस्यांच्या मदतीने रस्त्यावर पडलेले झाड तातडीने बाजूला करून रहदारीचा रस्ता मोकळा करण्यात आला. यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या सुरू असलेल्या वादळी पावसामुळे कुद्रेमनी गावच्या पूर्वेकडील अॅप्रीच रस्त्यावर सोमवारी मोठे झाड कोसळून रहदारीची कोंडी झाली होती. बेळगुंदी-सोनोली गावच्या दिशेकडून येणारे जाणारे अनेक वाहनधारक शेतीकामासाठी ये-जा करणारे शेतकरी बैलगाड्या, सायकली, चारचाकी वाहने या ठिकाणी अडकून होती. ही बाब पंचायतीचे अध्यक्ष संजय यलुप्पा पाटील, सदस्य-विनायक पाटील, सदस्य शांताराम पाटील, सदस्य अरूण देवण, सदस्य शिवाजी मुरकूटे यांना कळताच घटना ठिकाणी सर्वजण दाखल झाले. त्यांनी तात्काळ जेसीबी मागवून घेवून रस्त्यावरील झाडाची अडचण दूर करण्यास मदत केली व अडकून राहिलेली रहदारी सुरळीत सुरू झाली. यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
Home महत्वाची बातमी कुद्रेमनी रस्त्यावर पडलेले झाड हटविले
कुद्रेमनी रस्त्यावर पडलेले झाड हटविले
वार्ताहर/कुद्रेमनी ग्राम पंचायत सदस्यांच्या मदतीने रस्त्यावर पडलेले झाड तातडीने बाजूला करून रहदारीचा रस्ता मोकळा करण्यात आला. यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या सुरू असलेल्या वादळी पावसामुळे कुद्रेमनी गावच्या पूर्वेकडील अॅप्रीच रस्त्यावर सोमवारी मोठे झाड कोसळून रहदारीची कोंडी झाली होती. बेळगुंदी-सोनोली गावच्या दिशेकडून येणारे जाणारे अनेक वाहनधारक शेतीकामासाठी ये-जा करणारे शेतकरी बैलगाड्या, सायकली, चारचाकी […]