नेहरूनगर हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रम उत्साहात
संभाजीराव भिडे गुरुजींची उपस्थिती
बेळगाव : नेहरूनगर येथील श्री हनुमान मंदिरात गुरुवारी हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना, होम, कळस पूजन व महाप्रसाद उत्साहात पार पडला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण गावडे, भाजप नेते किरण जाधव, विश्वनाथ पाटील, चंद्रकांत खंडागळे, शहाजी ठक, अनिल वेताळ, गजानन पाटील, रवी भातकांडे, दादू पाटील आदी उपस्थित होते. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना, श्री हनुमान मूर्तीचे पूजन व कलश पूजन करण्यात आले. विवेक चौगुले दांपत्याच्या हस्ते होम व इतर पूजाविधी करण्यात आले. नेहरूनगरवासीयांकडून या कार्यक्रमात सुवर्ण सिंहासनासाठी संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याकडे निधी सुपूर्द करण्यात आला. गुरुवारी दुपारी झालेल्या महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
Home महत्वाची बातमी नेहरूनगर हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रम उत्साहात
नेहरूनगर हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रम उत्साहात
संभाजीराव भिडे गुरुजींची उपस्थिती बेळगाव : नेहरूनगर येथील श्री हनुमान मंदिरात गुरुवारी हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना, होम, कळस पूजन व महाप्रसाद उत्साहात पार पडला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण गावडे, भाजप नेते किरण जाधव, विश्वनाथ पाटील, चंद्रकांत खंडागळे, शहाजी ठक, अनिल वेताळ, […]