चेक बाऊन्सप्रकरणी मंत्री मधू बंगारप्पांना दिलासा

प्रतिनिधी/ बेंगळूर चेक बाऊन्सप्रकरणी दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या तुरुंग वासाच्या आदेशाला सत्र न्यायालयात आव्हान देणारे शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दंडाच्या 20 टक्के रक्कम जमा करण्याच्या अटीसह शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. 50 हजार रु. बाँड वैयक्तिक जातमुचलक्यावर तसेच  एक महिन्याच्या आत अट न पाळल्यास अंतरिम दिलासा रद्द करण्यात येईल, असा […]

चेक बाऊन्सप्रकरणी मंत्री मधू बंगारप्पांना दिलासा

प्रतिनिधी/ बेंगळूर
चेक बाऊन्सप्रकरणी दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या तुरुंग वासाच्या आदेशाला सत्र न्यायालयात आव्हान देणारे शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दंडाच्या 20 टक्के रक्कम जमा करण्याच्या अटीसह शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. 50 हजार रु. बाँड वैयक्तिक जातमुचलक्यावर तसेच  एक महिन्याच्या आत अट न पाळल्यास अंतरिम दिलासा रद्द करण्यात येईल, असा आदेश 56 व्या शहर दिवाणी न्यायालयाने दिला.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 29 डिसेंबर रोजी बेंगळूर लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांना 6 कोटी 96 लाख 70 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच दंड न भरल्यास कारावास भोगावा लागेल, असा निकाल दिला होता. सध्या एकूण दंडाच्या 20 टक्के रक्कम जमा करावी लागेल. या अटीचे पालन न केल्यास अंतरिम दिलासा रद्द करण्यात येईल, असे सत्र न्यायालयाने म्हटले आहे.