रिलायन्स इंडस्ट्रिजने कमावला 18951 कोटींचा नफा

जानेवारी-मार्च तिमाहीचा निकाल घोषित: तज्ञांच्या अपेक्षेपेक्षा नफा कमीच मुंबई : देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी आपला तिमाही निकाल जाहीर केला असून कंपनीने महसुलामध्ये अकरा टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीतील चौथ्या तिमाहीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने 2.4 लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. नफ्यात 2 टक्के घसरण मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या […]

रिलायन्स इंडस्ट्रिजने कमावला 18951 कोटींचा नफा

जानेवारी-मार्च तिमाहीचा निकाल घोषित: तज्ञांच्या अपेक्षेपेक्षा नफा कमीच
मुंबई : देशातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी आपला तिमाही निकाल जाहीर केला असून कंपनीने महसुलामध्ये अकरा टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीतील चौथ्या तिमाहीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने 2.4 लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.
नफ्यात 2 टक्के घसरण
मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या निव्वळ नफ्यात मात्र दोन टक्के घसरण झालेली आहे. जानेवारी-मार्चच्या दरम्यानच्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजने 18951 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार कंपनीने नफ्यामध्ये अपेक्षीत कामगिरी केलेली नसल्याचे समोर आले आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत आघाडीवर असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी तेलापासून ते अगदी रसायनापर्यंतच्या सर्व व्यवसायामध्ये उतरत व्यवसाय विस्तारावर भर दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या जामनगर रिफायनरीमध्ये दररोज चार दशलक्ष बॅरल प्रति दिवसाला तेल शुद्धीकरण केले जाते.
जिओची झकास कामगिरी
रिलायन्स इंडस्ट्रिजचा भाग असणाऱ्या जिओने दूरसंचार क्षेत्रात चांगली कामगिरी पार पाडली आहे. दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने सदरच्या तिमाहीत 13 टक्के इतका वाढीव नफा नोंदवला आहे. रिटेल क्षेत्राने जवळपास 11 टक्के इतका नफा वाढीव प्राप्त केला आहे. रिलायन्स जिओने मार्च अखेरच्या तिमाहीत 5583 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. या आधीच्या वर्षामध्ये समान तिमाहीत कंपनीने 4984 कोटी रुपये नफ्याच्या माध्यमातून कमावले होते.