हिडकल जलाशयातून कालव्यांना पाणी सोडा
शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मंत्री शिवानंद पाटील यांच्या विरोधात निदर्शने
बेळगाव : दुष्काळामुळे शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. जनावरांना पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यासाठी सरकारने तत्काळ हिडकल जलाशयाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडावे, या मागणीसह निपाणी तालुक्यातील शेंडूर येथे विनापरवाना पवनचक्की प्रकल्प उभारण्यात येत आहे. यावर कारवाई करण्यात यावी तसेच मंत्री शिवानंद पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी तत्काळ शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी करत कर्नाटक राज्य रयत संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. राज्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. पिकांना पाणी नसले तरी शेतकऱ्यांच्या जनावरांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांना जनावरांचे पालन, पोषण करणे कठीण झाले आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन हिडकल जलाशयातून उजव्या व डाव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
निपाणी तालुक्यातील शेंडूर येथे पवनचक्की प्रकल्प उभारण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक होत आहे. शेतकऱ्यांच्या बैलगाड्या व ट्रॅक्टर ये-जा करण्यासाठी हा रस्ता निर्माण करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने हा रस्ता निर्माण केला असला तरी पवनचक्की उभारल्या जाणाऱ्या कंपनीकडून या रस्त्याचा वापर करून घेतला जात आहे. रस्त्याचे बेकायदेशीरपणे रुंदीकरण केले जात आहे. याबाबत जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांच्या माध्यमातून दमदाटी केली जात आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असता पोलीस शेतकऱ्यांवरच अन्याय करत आहेत. शेतकऱ्यांनी रस्ता तयार केला असताना 19 लाखांचा खर्च दाखवून निधी लाटण्यात आला आहे. याबाबत जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून शेतकऱ्यांवर सुरू असलेला अन्याय त्वरित दूर करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. तसेच साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफी मिळाल्याने राज्यातील शेतकऱ्यांकडून दुष्काळ पडावा अशी त्यांची अपेक्षा आहे, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा शेतकऱ्यांकडून निषेध करण्यात आला. कृषी मंत्र्यांनी हे वक्तव्य मागे घ्यावे. शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडू, असा इशारा दिला.
Home महत्वाची बातमी हिडकल जलाशयातून कालव्यांना पाणी सोडा
हिडकल जलाशयातून कालव्यांना पाणी सोडा
शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मंत्री शिवानंद पाटील यांच्या विरोधात निदर्शने बेळगाव : दुष्काळामुळे शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. जनावरांना पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यासाठी सरकारने तत्काळ हिडकल जलाशयाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडावे, या मागणीसह निपाणी तालुक्यातील शेंडूर येथे विनापरवाना पवनचक्की प्रकल्प उभारण्यात येत आहे. यावर कारवाई […]