हरियाणाकडून विद्यमान विजेत्या सौराष्ट्रला धक्का

वृत्तसंस्था/ राजकोट 2024 च्या रणजी क्रिकेट हंगामातील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात हरियाणाने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर विद्यमान विजेत्या सौराष्ट्रचा चार गड्यांनी पराभव केला. या सामन्यात सौराष्ट्रने पहिल्या डावात 145 धावा जमवल्यानंतर हरियाणाचा पहिला डाव 67 षटकात 200 धावावर समाप्त झाला. हरियाणाने सौराष्टवर पहिल्या धावात 55 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर सौराष्ट्रने 6 बाद 148 या धावसंख्येवरून […]

हरियाणाकडून विद्यमान विजेत्या सौराष्ट्रला धक्का

वृत्तसंस्था/ राजकोट
2024 च्या रणजी क्रिकेट हंगामातील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात हरियाणाने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर विद्यमान विजेत्या सौराष्ट्रचा चार गड्यांनी पराभव केला.
या सामन्यात सौराष्ट्रने पहिल्या डावात 145 धावा जमवल्यानंतर हरियाणाचा पहिला डाव 67 षटकात 200 धावावर समाप्त झाला. हरियाणाने सौराष्टवर पहिल्या धावात 55 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर सौराष्ट्रने 6 बाद 148 या धावसंख्येवरून रविवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 220 धावा आटोपला. सौराष्ट्रच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने 43, वासवदाने 45, पार्थ भूतने 47 धावा जमवल्या. हरियाणातर्फे निशांत सिंधूने 84 धावात पाच गडी बाद केले. त्यानंतर हरियाणाने दुसऱ्या डावात 59.1 षटकात 6 बाद 168 धावा जमवत हा सामना चार गड्यांनी जिंकला. हरियाणाच्या दुसऱ्या डावात अशोक मिनारीया याने नाबाद 58 धावा झळकवल्या. सौराष्ट्रतर्फे धमेंद्रसिंग जडेजाने चार गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : सौराष्ट्र प. डाव 145, हरियाणा प. डाव सर्वबाद 200, सौराष्ट्र दु. डाव सर्व बाद 220, हरियाणा दु. डाव 6 बाद 168 (अशोक मिनारीया नाबाद 58, धमेंद्रसिंग जडेजा 4-58,
सामना अनिर्णित अवस्थेकडे
पुणे- यजमान महाराष्ट्र आणि झारखंड यांच्यात सुरू असलेला रणजी सामन्यात रविवारी खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर महाराष्ट्रने पहिल्या डावात 543 धावांचा डोंगर रचला. तत्पुर्वी झारखंडने पहिल्या डावात 403 धावा जमवल्या होत्या. महाराष्ट्रच्या पहिल्या डावात 3 फलंदाजांनी शतके झळकविली. केदार जाधवने 182, पवन शहाने 136 तर अंकित बावणेने नाबाद 114 धावा झळकवल्या. महाराष्ट्रने झारखंडवर 140 धावांची आघाडी घेतली आहे.
संक्षिप्त धावफलक : झारखंड प. डाव सर्वबाद 403, महाराष्ट्र प. डाव 132 षटकात सर्वबाद 543 (केदार जाधव 182, पवन शहा 136, अंकित बावणे नाबाद 114).