महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी APAAR ID नोंदणी करणे बंधनकारक केले
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी APAAR ID बंधनकारक करण्याची घोषणा केली आहे. अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
याचा उद्देश्य विद्यार्थ्यांचे गुणपत्रके आणि शैक्षणिक नोंदी पूर्णपणे डिजिटल स्वरूपात करून सुरक्षितरित्या उपलब्ध करणे आहे.
ALSO READ: अजित आणि रोहित दिल्लीत शरद पवारांना भेटले, महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चांना उधाण
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 2026 पासून 1o वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका डिजिलॉकर वरून उपलब्ध होणार आहे. या मुळे कागदी प्रमाणपत्रे गहाळ होणे, फाटणे किंवा पडताळणीसाठी वारंवार अडचणींचा सामोरी जाणे या पासून विद्यार्थ्यांची सुटका होईल. या साठी 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना APAAR ID नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे.
APAAR ID काय आहे?
APAAR ID ही विद्यार्थ्यांची कायमस्वरूपी डिजिटल शैक्षणिक ओळख आहे. या एकाच आयडीवर विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक रेकॉर्ड, संग्रहित होतील.प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती अर्ज, दस्तऐवज तपासणी आणि नोकरीसाठी लागणारी पडताळणी या सर्व गोष्टी या प्रणालीमुळे लवकर होतील.
गुणपत्रिकांच्या डिजिटलायझेशनमुळे चुका, गहाण होणे, किंवा कागदपत्रांची जपणूक करण्या सारख्या समस्या दूर होतील.
ALSO READ: “मला मुख्यमंत्र्यांची दया येते,” उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला
विद्यार्थी APAAR ID असल्यास देशात कुठूनही रेकॉर्ड मध्ये सहज प्रवेश करू शकतील.
या साठी राज्य मंडळाने सर्व मान्यताप्राप्त शाळांना आणि महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची अपार ID ची नोंदणी करुन अहवाल www.mahahsscboard.in वर अपलोड करण्यास सांगितले आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक असून, कोणताही विद्यार्थी नोंदणीपासून वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Edited By – Priya Dixit
ALSO READ: आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा युतीचा फॉर्म्युला तयार, नवी मुंबईवरील गतिरोध, या भागात मैत्रीपूर्ण लढती
