सुधारककार पत्रकारिता पुरस्कार दिपक प्रभावळकर यांना जाहीर
कराड प्रतिनिधी
सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पत्रकारिता पुरस्कार “भारत लाईव्ह न्यूज मीडिया”चे सातारा आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांना जाहीर झाला आहे. सोमवार 15 जुलै रोजी याचे वितरण माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण, ज्येष्ठ व्याख्याते प्रा. नितीन बानूगडे पाटील आदींच्या हस्ते कराड येथे होणार आहे.
येथील इंद्रधनु फाउंडेशनच्या वतीने या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यांत दीपक प्रभावळकर यांच्यासह सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार सचिन जवळकोटे, मुंबईच्या सोनाली शिंदे, सामनाचे गजानन चेणगे यांनाही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
फाउंडेशनच्यावतीने यंदा जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ संपादक मधुकर भावे यांना बहाल करण्यात आला आहे. या घोषणा फाउंडेशनचे विश्वस्त विकास भोसले, नितीन ढापरे, संदीप चेणगे, प्रमोद तोडकर, अशोक मोहने, माणिक डोंगरे यांनी कराड येथे केल्या आहेत.