Satara : भुईजमध्ये ऊस हंगामात वाहतुकीसाठी राबवली रिफ्लेक्टर मोहीम

                      किसन वीर कारखान्यात वाहतुकीसाठी सुरक्षा उपाय जोरात भुईज : किसन वीर साखर कारखान्याचा गळित हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस तोड वाहनांच्या वर्दळीमुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. संभाव्य अपघात टाळण्यासाठी व स्वसुरक्षेतेसाठी वाहन मालकांनी दक्षता घेऊन आपल्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवून संभाव्य अपघात टाळावेत, असे आवाहन […]

Satara : भुईजमध्ये ऊस हंगामात वाहतुकीसाठी राबवली रिफ्लेक्टर मोहीम

                      किसन वीर कारखान्यात वाहतुकीसाठी सुरक्षा उपाय जोरात
भुईज : किसन वीर साखर कारखान्याचा गळित हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस तोड वाहनांच्या वर्दळीमुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. संभाव्य अपघात टाळण्यासाठी व स्वसुरक्षेतेसाठी वाहन मालकांनी दक्षता घेऊन आपल्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवून संभाव्य अपघात टाळावेत, असे आवाहन किसन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिदे यांनी केले.
किसन वीर साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, मुंगळा गाडी, बैलगाड्यांना भुईंज पोलीस किसन वीर साखर कारखान्ऱ्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, मुंगळा गाडी, बैलगाड्यांना रिफ्लेक्टरचे वाटप करण्यात आले.
स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक पोलीस फौजदार वैभव टकले, सहाय्यक वाहतूक हवालदार सुशांत धुमाळ, संचालक बाबासाहेब कदम, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, हणमंत चवरे, प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणबरे यांच्या हस्ते रिफ्लेक्टर बसविण्यात आले.