हवामान खात्याने मध्य महाराष्ट्राच्या (maharashtra) काही भागांसाठी 24 जुलैपर्यंत रेड अलर्ट (red alert) जारी केला आहे. मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे, पालघर आणि रायगड या भागात राहणाऱ्या प्रवाशांसाठी हा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून दुपारी मोठी भरती येण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. मुंबई आणि ठाण्यात मंगळवारी यलो तर बुधवारी ऑरेंज अलर्टसह (orange alert) मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रेड अलर्टचा विस्तार गुजरात, कोकण, गोवा आणि पश्चिम मध्य प्रदेशपर्यंत आहे.शनिवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली होती. भांडुपमध्ये मोबाईल टॉवर कोसळल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच पोलिस ठाण्यांमध्ये पाणी तुंबल्याचे चित्र देखील सोशल मीडियावर आहे. अतिवृष्टीचा इशारा दिल्याने राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाने (NDRF) संपूर्ण महाराष्ट्रात आपली पथके तैनात केली आहेत. मुंबई आणि नागपूर इथे एनडीआरएफची पथके तैनात केली आहेत. तसेच वसई (पालघर), ठाणे, घाटकोपर, पवई (कुर्ला), महाड (रायगड), खेड आणि चिपळूण (रत्नागिरी), कुडाळ (सिंधुदुर्ग), कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे देखील बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.हेही वाचायेत्या तीन ते चार तासांत मुंबईत मुसळधार पावसाची शक्यताकोकणासाठी मुंबईतून 202 गणपती स्पेशल ट्रेन धावणार
मध्य महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी 24 जुलैपर्यंत रेड अलर्ट