‘आरसीबी’चा सामना आज पंजाब किंग्जशी

दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढत वृत्तसंस्था/ धरमशाला पुनरागमन केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा सामना आज गुरुवारी येथे अंदाज न वर्तविता येणाऱ्या पंजाब किंग्जशी होणार असून इंडियन प्रीमियर लीगमधील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी या दोन्ही बाजू सध्या धडपडत आहेत. यावेळी बेंगळूरला सलग चौथ्या विजयाची अपेक्षा असेल. हंगामाची खराब पद्धतीने सुऊवात केल्यानंतर आरसीबीला स्पर्धेत पुनरागमन करण्यात यश आले आहे. त्यांनी […]

‘आरसीबी’चा सामना आज पंजाब किंग्जशी

दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढत
वृत्तसंस्था/ धरमशाला
पुनरागमन केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा सामना आज गुरुवारी येथे अंदाज न वर्तविता येणाऱ्या पंजाब किंग्जशी होणार असून इंडियन प्रीमियर लीगमधील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी या दोन्ही बाजू सध्या धडपडत आहेत. यावेळी बेंगळूरला सलग चौथ्या विजयाची अपेक्षा असेल.
हंगामाची खराब पद्धतीने सुऊवात केल्यानंतर आरसीबीला स्पर्धेत पुनरागमन करण्यात यश आले आहे. त्यांनी शेवटचे तीन सामने सर्वसमावेशकपणे जिंकून विजयाची गती राखली आहे. या विजयांमुळे त्यांचे ढासळणारे मनोबल तर वाढले आहेच, त्याचबरोबर गुणतालिकेत सातव्या स्थानावरही ते पोहोचले आहेत. 11 सामन्यांतून आठ गुणांसह आरसीबी अजूनही प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. मात्र त्यासाठी त्यांना उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील. असे असले, तरी त्यांची संधी धूसर आहे.
पंजाब किंग्जचीही अशीच स्थिती आहे. त्यांनी 11 सामन्यांतून आठ गुण जमा करून आठव्या स्थानावर कब्जा केला आहे. तथापि, दोघांपैकी फक्त एक संघ महत्त्वाचा 14 गुणांचा टप्पा गाठू शकतो. मोसमाच्या सुऊवातीला पंजाबला पराभूत केलेले असल्याने आणि तीन विजय मिळवून या लढतीत उतरणार असल्याने आरसीबीला यजमानांपेक्षा अधिक आत्मविश्वास वाटेल. त्यांचा विराट कोहली अव्वल स्थानावर सातत्य राखून आहे, तर कर्णधार फाफ डू प्लेसिसने मागील सामन्यात आक्रमक खेळी करत खराब कामगिरीचा सिलसिला तोडला आहे.
विल जॅक्सने गुजरात टायटन्सविऊद्ध केलेल्या सामना जिंकून देणाऱ्या शतकातून सर्वंना प्रभावित केलेले आहे आणि कॅमेरून ग्रीनने सनरायझर्स हैदराबादविऊद्ध फलंदाजी व गोलंदाजीतही महत्त्वपूर्ण योगदान देऊन आपले अष्टपैलू कौशल्य दाखवले आहे. त्यातच मोहम्मद सिराजला लय मिळाल्याने त्यांच्या माऱ्याला धार आली आहे. यश दयाल आणि विजयकुमार वैशाख यांनीही गुजरातविरुद्ध चांगली कामगिरी केली आणि आरसीबीला त्यांच्याकडून त्याच पद्धतीने पुढे जाण्याची अपेक्षा असेल.
दुसरीकडे, पंजाबचा आत्मविश्वास कमी झालेला असेल. चेन्नई सुपर किंग्जविऊद्ध त्यांची फलंदाजी कोसळली. पंजाबसाठी यंदाचा हंगाम अंदाज वर्तविण्यास कठीण असा राहिलेला आहे. सीएसके आणि कोलकाता नाईट रायडर्सवर दूरस्थ सामन्यांत विजय मिळवून त्यांनी त्यांची क्षमता दाखवलेली आहे. केकेआरविरुद्ध तर त्यांनी ‘टी-20’ क्रिकेटमधील सर्वांत मोठे लक्ष्य गाठून दाखविले. मात्र, त्यांना घरच्या मैदानांवर अडचणी येत आहेत. मुल्लानपूरमध्ये त्यांनी पाचपैकी फक्त एक लढत जिंकली आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवरील मागील सामन्यात देखील त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पंजाबचा संघ आजच्या सामन्यातून घरच्या मैदानावरील ही वाटचाल बदलू पाहील. परंतु त्यासाठी त्यांच्या साऱ्या विभागांना एकजुटीने चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल.
संघ : पंजाब किंग्ज : सॅम करन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वत कवेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रोसोव.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैशाख, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.