दिल्ली कॅपिटल्सकडून आरसीबी पराभूत
बेंगळूर : महिलांच्या दुसऱ्या प्रिमीयर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुरूवारी येथे खेळविण्यात आलेल्या 7 व्या सामन्यात शेफाली वर्मा आणि अॅलिस कॅप्से यांची शानदार फलंदाजी तसेच मेरिझन कॅप व जेस जोनासन यांच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने यजमान आरसीबीचा (रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर) 25 धावांनी पराभव केला. आरसीबी संघाची कर्णधार स्मृती मानधनाचे अर्धशतक वाया गेले. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी दिली. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 बाद 194 धावा जमवित आरसीबीला विजयासाठी 195 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर आरसीबीने 20 षटकात 9 बाद 169 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.
दिल्ली कॅपिटल्सच्या डावामध्ये शेफाली वर्माने 31 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 50, कॅप्सेने 33 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 46, कर्णधार लेनिंगने 17 चेंडूत 2 चौकारांसह 11, कॅपने 16 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 32, जोनासेनने 16 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 36, रे•ाrने 4 चेंडूत 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. रॉड्रीग्जला खाते उघडता आले नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या डावात 11 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. आरसीबीतर्फे सोफी डिव्हाइन आणि डिक्लर्क यांनी प्रत्येकी 2 तर श्रेयांका पाटीलने 1 गडी बाद केला. शेफाली वर्मा आणि कॅप्से यांनी दुसऱ्या गड्यासाठी 8.1 षटकात 82 धावांची भागीदारी केली. तसेच जोनासेन आणि कॅप यांनी 5 व्या गड्यासाठी 48 धावांची भर घातली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना स्मृती मानधना आणि डिव्हाइन यानी डावाला दमदार सुरूवात केली. या सलामीच्या जोडीने 51 चेंडूत 77 धावांची भागीदारी केली. डिव्हाइनने 17 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 23 धावा जमविल्या. मानधनाला मेघनाकडून बऱ्यापैकी साथ मिळाली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 35 धावांची भर घातली. मेघनाने 31 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 36 धावा जमविल्या. रिचा घोषने 13 चेंडूत 2 षटकारांसह 19 धावा केल्या. मानधनाने 43 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारासह 74 धावा झोडपल्या. मानधना बाद झाल्यानंतर आरसीबीचे फलंदाज अधिकवेळ खेळपट्टीवर राहू शकले नाहीत. उत्तुंग फटके मारण्याच्या नादात ते झेलबाद झाले. जोनासेनने आपल्या शेवटच्या षटकामध्ये 3 गडी बाद केले. आरसीबीच्या डावात 8 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. दिल्ली कॅपिटल्सतर्फे जोनासेनने 21 धावात 3 तर कॅप आणि रे•ाr यांनी प्रत्येकी 2 गडी तर शिखा पांडेने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकात 5 बाद 194 (शेफाली वर्मा 50, कॅप्से 46, कॅप 32, जोनासेन 36, लेनिंग 11, रे•ाr 10, अवांतर 9, डिव्हाइन 2-23, डिक्लर्क 2-35, पाटील 1-40), आरसीबी- 20 षटकात 9 बाद 169 (स्मृती मानधना 74, डिव्हाइन 23, मेघना 36, रिचा घोष 19, अवांतर 5, जोनासेन 3-21, कॅप 2-35, रे•ाr 2-38, पांडे 1-27).
Home महत्वाची बातमी दिल्ली कॅपिटल्सकडून आरसीबी पराभूत
दिल्ली कॅपिटल्सकडून आरसीबी पराभूत
बेंगळूर : महिलांच्या दुसऱ्या प्रिमीयर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुरूवारी येथे खेळविण्यात आलेल्या 7 व्या सामन्यात शेफाली वर्मा आणि अॅलिस कॅप्से यांची शानदार फलंदाजी तसेच मेरिझन कॅप व जेस जोनासन यांच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने यजमान आरसीबीचा (रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर) 25 धावांनी पराभव केला. आरसीबी संघाची कर्णधार स्मृती मानधनाचे अर्धशतक वाया गेले. या सामन्यात […]