‘पटना शुक्ला’मध्ये रविना टंडन
सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित
रविना टंडन देखील मागील काही काळापासून सातत्याने ओटीटीवर झळकत आहे. आता रविनाने स्वत:च्या नव्या सीरिजची घोषणा केली आहे. याचे नाव ‘पटना शुक्ला’ आहे. पटना शुक्लाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून यात रविना वकिलाची भूमिका साकारत आहे.
अन्यायाने दाबलेल्या आवाजाला न्याय मिळवून देणाऱ्या वकिलाची भूमिका रविना साकारत आहे. यातील तिच्या व्यक्तिरेखेचे नाव तन्वी असून ती समाज, परिवार, राजकीय डावपेचाशी लढून खटला जिंकत असल्याचे दाखविले जाणार आहे.
या सीरिजची निर्मिती अरबाज खान करत आहे. तर विवेक बुधकोटिने याचे दिग्दर्शन केले आहे. या सीरिजमध्ये दिवंगत सतीश कौशिकही दिसून येणार आहेत. ही सीरिज 29 मार्च रोजी डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजला सलमान खानने प्रमोट केले आहे.
Home महत्वाची बातमी ‘पटना शुक्ला’मध्ये रविना टंडन
‘पटना शुक्ला’मध्ये रविना टंडन
सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित रविना टंडन देखील मागील काही काळापासून सातत्याने ओटीटीवर झळकत आहे. आता रविनाने स्वत:च्या नव्या सीरिजची घोषणा केली आहे. याचे नाव ‘पटना शुक्ला’ आहे. पटना शुक्लाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून यात रविना वकिलाची भूमिका साकारत आहे. अन्यायाने दाबलेल्या आवाजाला न्याय मिळवून देणाऱ्या वकिलाची भूमिका रविना साकारत आहे. यातील तिच्या व्यक्तिरेखेचे नाव तन्वी […]
