Breakfast recipe : रवा आप्पे
साहित्य-
1 कप रवा
1 कप दही
1/2 कप पाणी
1 छोटा कांदा
1 गाजर
1 हिरवी मिरची
1/4 कप कोथिंबीर
मीठ चवीनुसार
1/2 मोहरी
8-10 कढी पत्ता
2 चमचे तेल
1/2 चम्मच बेकिंग सोडा
कृती-
सर्वात आधी एका भांड्यात रवा घ्यावा. त्यात समान प्रमाणात दही घालावे. जर घट्ट वाटत असेल तर त्यात थोडे पाणी घालून पीठ तयार करावे. आता अर्धा तास भिजत ठेवावे. रवा फुगल्यावर सर्व चिरलेल्या भाज्या त्यात मिक्स कराव्या. यानंतर मीठ घालावे. आता तुम्हाला फोडणी तयार करण्यासाठी एका कढईत तेल गरम करून मोहरी घालावी. मोहरी तडतडायला लागली की त्यात कढीपत्ता घालावा. आता हा तडका पिठात मिक्स करावा. व शेवटी बेकिंग सोडा घालवा. व मिक्स करून घ्यावे. आता अप्पे पात्र गरम करून आणि ब्रशच्या मदतीने त्यात तेल लावावे. तेल लावल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने पीठ भरावे. शेवटी झाकून मध्यम आचेवर शिजवावे. तर चला तयार आहे आपले रवा आप्पे नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik