रौफ मध्यवर्ती करारात पुन्हा सामील

वृत्तसंस्था/ लाहोर पाक क्रिकेट मंडळाने (पीसीबी) हॅरीस रौफला मध्यवर्ती करारात पुन्हा सामील करून घेतले आहे. दरम्यान हॅरीस रौफने आपल्याकडून झालेल्या चुकांची लेखी स्वरुपात दिलगिरी व्यक्त केल्याने पीसीबीने रौफचा मध्यवर्ती करारात समावेश करण्यात येणार आहे. अलीकडेच पाक क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा दौरा केला होता. दरम्यान फेब्रुवारीच्या प्रारंभी पाकिस्तान सुपर लिग टी-20 स्पर्धा सुरू झाल्याने रौफने येत्या हिवाळी […]

रौफ मध्यवर्ती करारात पुन्हा सामील

वृत्तसंस्था/ लाहोर
पाक क्रिकेट मंडळाने (पीसीबी) हॅरीस रौफला मध्यवर्ती करारात पुन्हा सामील करून घेतले आहे. दरम्यान हॅरीस रौफने आपल्याकडून झालेल्या चुकांची लेखी स्वरुपात दिलगिरी व्यक्त केल्याने पीसीबीने रौफचा मध्यवर्ती करारात समावेश करण्यात येणार आहे.
अलीकडेच पाक क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा दौरा केला होता. दरम्यान फेब्रुवारीच्या प्रारंभी पाकिस्तान सुपर लिग टी-20 स्पर्धा सुरू झाल्याने रौफने येत्या हिवाळी मोसमात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिका दौऱ्यासाठी आपण उपलब्ध राहू. पण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपण उपलब्ध होऊ शकणार नाही असे रौफने पीसीबीला कळविले होते. दरम्यान पीसीबीच्या शिस्तपालन नियमानुसार हॅरीस रौफशी मध्यवर्ती करार रद्द केला होता. पीसीबीकडून रौफला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. रौफने लागलीच लेखी स्वरुपात दिलगिरीचे पत्र मंडळाकडे पाठवून दिले. या प्रकरणी पीसीबीने रौफबरोबरचा मध्यवर्ती करार पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.