रौफ पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता

वृत्तसंस्था/ कराची पाकचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ आता दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला असून तो आता चालू महिन्याच्या अखेरीस इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात खेळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा पहिला सामना लिड्स मैदानावर होणार आहे. 1 जूनपासून सुरु होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकच्या 15 सदस्यांच्या संघामध्ये रौफचा समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात […]

रौफ पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता

वृत्तसंस्था/ कराची
पाकचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ आता दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला असून तो आता चालू महिन्याच्या अखेरीस इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात खेळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा पहिला सामना लिड्स मैदानावर होणार आहे.
1 जूनपासून सुरु होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकच्या 15 सदस्यांच्या संघामध्ये रौफचा समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लिड्सचा पहिला सामना 22 मे रोजी खेळविला जाईल. या मालिकेसाठी पाक संघाच्या सरावाला यापूर्वीच प्रारंभ झाला आहे. हॅरिस रौफने नेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून गोलंदाजीच्या सरावावर अधिक भर दिला आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात पाक सुपर लिग क्रिकेट स्पर्धेत खेळताना हॅरिस रौफला स्नायू दुखापत झाली होती. 24 मे रोजी पाकचा अंतिम 15 जणांचा संघ टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी जाहीर केला जाईल.