Ratnagiri : तरुणास 24 लाखांचा गंडा घालणारा भामटा गजाआड

खेड /प्रतिनिधी नामांकित कंपनीत गुंतवणूक करून जादा परताव्याची रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवत शहरातील एका तरुणास 24 लाख 85 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणाऱया भामट्याच्या येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हरियाणातून मुसक्या आवळल्या. नीरज महेंद्र जांगरा (22 चंदिगढ -हरियाणा) असे भामट्याचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात […]

Ratnagiri : तरुणास 24 लाखांचा गंडा घालणारा भामटा गजाआड

खेड /प्रतिनिधी

नामांकित कंपनीत गुंतवणूक करून जादा परताव्याची रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवत शहरातील एका तरुणास 24 लाख 85 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणाऱया भामट्याच्या येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हरियाणातून मुसक्या आवळल्या. नीरज महेंद्र जांगरा (22 चंदिगढ -हरियाणा) असे भामट्याचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आले.