नेपाळी गुरखे असलेल्या सख्ख्या भावांच्या खूनाने रत्नागिरी हादरली

रत्नागिरी : प्रतिनिधी पावस नजीकच्या गोळप मुस्लिम मोहल्ला येथे आंब्याच्या बागेत राखणदार असलेल्या दोन नेपाळी गुरख्यांच्या खूनामुळे रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. खून झालेले दोघे सख्खे भाऊ असून सोमवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचा संशय आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. भक्त बहादुर थापा ६० आणि लल्लन बहादूर थापा ५५ अशी खून झालेल्यांची नावे आहेत. रत्नागिरी […]

नेपाळी गुरखे असलेल्या सख्ख्या भावांच्या खूनाने रत्नागिरी हादरली

रत्नागिरी : प्रतिनिधी
पावस नजीकच्या गोळप मुस्लिम मोहल्ला येथे आंब्याच्या बागेत राखणदार असलेल्या दोन नेपाळी गुरख्यांच्या खूनामुळे रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. खून झालेले दोघे सख्खे भाऊ असून सोमवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचा संशय आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. भक्त बहादुर थापा ६० आणि लल्लन बहादूर थापा ५५ अशी खून झालेल्यांची नावे आहेत. रत्नागिरी पावस बायपास मार्गावर मुस्लिम मोहल्ल्यात मुदसर मुकादम यांच्या आंब्याच्या बागेत ही घटना घडली. आंबा चोरीच्या प्रयत्नातून की पूर्ववैमनस्यातून खून झाला, याबाबत पोलिस तपास करत आहेत.