कोंडसर बु. येथे मासे पकडण्यास गेलेले दोघेजण बुडाले
राजापूर / वार्ताहर
राजापूर तालुक्यातील कोंडसर बु. येथे मासेमारीसाठी गेलेल्या चौघांपैकी दोघेजण वाहून गेल्याची घटना रविवारी रात्री घडली असून वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. कोंडसर बु. येथील चौघेजण रविवारी रात्री मासे पकडण्यासाठी गेले असता एकजण पाण्याच्या प्रवाहात बुडू लागल्याने दुसऱ्याने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र दुर्दैवाने दोघेही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले.