Ratnagiri Breaking : राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल! साळवींच्या मालमत्तांवर एसीबीचे धाडसत्र सुरुच!

गेल्या काही महिन्य़ांपासून चौकशीचा ससेमिरा लागलेले ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर तसेच त्यांच्या पत्नी आणि मुलग्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल झाला आहे. ज्ञात उत्पन्नापेक्षा ११८ टक्क्यांनी जास्त बेकायदेशीर मालमत्ता सापडल्याने राजन साळवी याच्यासह त्यांच्या कुटुंबावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईची माहीती मिळतात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांची फोनवरून चौकशी केल्याचं […]

Ratnagiri Breaking : राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल! साळवींच्या मालमत्तांवर एसीबीचे धाडसत्र सुरुच!

गेल्या काही महिन्य़ांपासून चौकशीचा ससेमिरा लागलेले ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर तसेच त्यांच्या पत्नी आणि मुलग्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल झाला आहे. ज्ञात उत्पन्नापेक्षा ११८ टक्क्यांनी जास्त बेकायदेशीर मालमत्ता सापडल्याने राजन साळवी याच्यासह त्यांच्या कुटुंबावर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईची माहीती मिळतात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांची फोनवरून चौकशी केल्याचं सुत्रांनी सांगितले आहे.
कोकणातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त एकुण ३, ५३,८९,७५२ /- रुपये इतकी अपसंपदा जमा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या ही संपत्ती एकुण उत्पन्नाच्या ११८.९६ % इतकी मोजली गेली.
त्यानंतर आज सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB)ने त्यांच्या राहत्या घरावर धाड टाकली. राजन साळवी यांचे जुनं घर, भावाचं घर यांचबरोबर त्यांच्या हॉटेल्सवरही धाडी टाकण्यात आल्या असून अजून चार मालमत्तांवर एसीबीने आपले शोधकार्य सुरू ठेवले आहे.
दरम्यान या कारवाईची माहीती मिळताच ठाकरे गटाचे प्रमुख उद्घव ठाकरे यांनी राजन साळवी यांची फोनवरून चौकशी करून त्यांना दिलासा दिला आहे. त्यासंदर्भाची माहीती राजन साळवी यांनी स्वता माध्यमांना दिली आहे. आमदार राजन साळवी यांच्यावर कारवाईमुळे त्यांच्या बंगल्याच्या परिसरात मोठा पोलिसांचा फौजफाटा ठेवला असून शहरभरामध्ये ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे.