रत्नागिरीत आषाढी एकादशीनिमित्त रंगणार ‘भक्तीनाद’

मराठा भवनात 16 रोजी लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप. सोसायटी पस्तुत नृत्याचा विशेष कार्यकम; 18 रोजी लांजा शहरातही होणार सादरीकारण रत्नागिरी पतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त अभंगांवर आधारित भक्तीनाद हा नृत्याविष्काराचा कार्यकम आयोजित करण्यात आला आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीतर्फे आयोजित हा कार्यकम मंगळवार 16 जुलै रोजी शहरातील माळनाका परिसरातील मराठा भवन मंगल कार्यालयात होणार आहे. अभंगावर […]

रत्नागिरीत आषाढी एकादशीनिमित्त रंगणार ‘भक्तीनाद’

मराठा भवनात 16 रोजी लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप. सोसायटी पस्तुत नृत्याचा विशेष कार्यकम; 18 रोजी लांजा शहरातही होणार सादरीकारण

रत्नागिरी पतिनिधी

आषाढी एकादशीनिमित्त अभंगांवर आधारित भक्तीनाद हा नृत्याविष्काराचा कार्यकम आयोजित करण्यात आला आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीतर्फे आयोजित हा कार्यकम मंगळवार 16 जुलै रोजी शहरातील माळनाका परिसरातील मराठा भवन मंगल कार्यालयात होणार आहे. अभंगावर आधारित हा नृत्याविष्काराचा कार्यकम मंगळवारी सायंकाळी 5 ते रात्री 8 च्या दरम्यान सादर होणार आहे. देवरुख येथील कथ्थक नृत्यांगना शिल्पा मुंगळे व सहकारी हा कार्यकम साजरा करणार आहेत. ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया संवाद’ या कार्यकमासाठी माध्यम पायोजक आहे.
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तीत एकरुप होण्यासाठी विशेष कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी लि. च्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त अख्ंाड भक्तीचा नृत्य गजर ‘भक्तीनाद’ या कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे. विठ्ठल भक्तीत तल्लीन करणारे अभंग आणि त्यावर आधारित कथ्थक नृत्याचा हा कार्यकम नृत्यगुरु शिल्पा मुंगळे (कथ्थक नृत्यालंकार-देवरुख) सादर करणार आहेत. या कार्यकमात कुणाल भिडे (गायन अलंकार पदवी पाप्त, देवरुख) यांचे गायन सादर होणार आहे. या कार्यकमात स्कंधा चितळे (कथ्थक नृत्यालंकार, चिपळूण), कश्मिरा मुंगळे (नृत्य विशारद, देवरुख) आणि शर्वरी अवसरे (नृत्य विशारद) नृत्य सादर करणार आहेत. तर या कार्यकमाचे निवेदन डॉ. निधी पटवर्धन करणार आहेत. हा कार्यकम पेक्षकांसाठी विनामूल्य आहे.
लांजातही 18 रोजी ‘भक्तीनाद’
रत्नागिरीनंतर भक्तीनाद हा नृत्याविष्काराचा कार्यकम लांजातील गणेश मंगल कार्यालय, जावडे रोड, सारस्वत वसाहत येथे गुरुवार 18 जुलै रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत सादर होणार आहे.