प्रभाससोबत झळकणार रश्मिका

संदीप रेड्डी वांगांकडून ‘स्पिरिट’ची निर्मिती अभिनेत्री रश्मिका मंदाना आता बाहुबली फेम अभिनेता प्रभाससोबत ‘स्पिरिट’ चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅनिमल फेम संदीप रेड्डी वांगा करणार आहेत. रश्मिका आणि प्रभास या जोडीचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. रश्मिका मंदानाचा संदीप रेड्डी वांगासोबतचा हा दुसरा चित्रपट ठरणार आहे. यापूर्वी ती त्याच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसून […]

प्रभाससोबत झळकणार रश्मिका

संदीप रेड्डी वांगांकडून ‘स्पिरिट’ची निर्मिती
अभिनेत्री रश्मिका मंदाना आता बाहुबली फेम अभिनेता प्रभाससोबत ‘स्पिरिट’ चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅनिमल फेम संदीप रेड्डी वांगा करणार आहेत. रश्मिका आणि प्रभास या जोडीचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे.
रश्मिका मंदानाचा संदीप रेड्डी वांगासोबतचा हा दुसरा चित्रपट ठरणार आहे. यापूर्वी ती त्याच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसून आली होती. यात रणवीर कपूर हा मुख्य भूमिकेत होता. चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ति डिमरी देखील दिसून आली होती.
स्पिरिट या चित्रपटाचे चित्रिकरण चालू वर्षीच सुरू होणार आहे. रश्मिका सध्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. 15 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर प्रभार यापूर्वी ‘सलार’ चित्रपटात दिसून आला होता. आता तो ‘कल्कि 2898डी’ चित्रपटात दिसून येणार आहे. यात त्याच्यासोबत दीपिका पदूकोन, कमल हासन आणि अमिताभ बच्चन यासारखे कलाकार असतील. हा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे.