रश्मिकाला चित्रपटसृष्टीत 7 वर्षे पूर्ण

रश्मिका मंदानाने 2016 मध्ये ऋषभ शेट्टीचा चित्रपट ‘किरिक पार्टी’मधून स्वत:च्या कारकीर्दीला प्रारंभ केला होता. चित्रपटसृष्टीतील रश्मिकाचा 7 वर्षांचा प्रवास अत्यंत शानदार राहिला आहे. अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. स्वत:चा 7 वर्षांचा प्रवास कसा राहिला आणि यात चाहत्यांनी किती योगदान दिले हे अभिनेत्रीने एका विशेष संदेशाद्वारे सांगितले आहे. ही 7 वर्षे खरोखरच एका चांगल्या […]

रश्मिकाला चित्रपटसृष्टीत 7 वर्षे पूर्ण

रश्मिका मंदानाने 2016 मध्ये ऋषभ शेट्टीचा चित्रपट ‘किरिक पार्टी’मधून स्वत:च्या कारकीर्दीला प्रारंभ केला होता. चित्रपटसृष्टीतील रश्मिकाचा 7 वर्षांचा प्रवास अत्यंत शानदार राहिला आहे. अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. स्वत:चा 7 वर्षांचा प्रवास कसा राहिला आणि यात चाहत्यांनी किती योगदान दिले हे अभिनेत्रीने एका विशेष संदेशाद्वारे सांगितले आहे. ही 7 वर्षे खरोखरच एका चांगल्या प्रवासाची होती. यात चाहत्यांनी मला चांगलाच पाठिंबा दिला. चाहत्यांनी मला पुढील टप्पा गाठताना पाहिले आहे. आणखी अनेक सुंदर वर्षांसाठी सर्वांना शुभेच्छा, असे रश्मिकाने नमूद पेले आहे. रश्मिकाचा पहिला चित्रपट किरिक पार्टी 2016 सालच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. पहिल्याच चित्रपटातील भूमिकेद्वारे तिने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिला सर्वोत्तम पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला होता. यानंतर तिने चमक, अंजनी पुत्र आणि चलो यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. तर विजय देवरकोंडासोबतचा चित्रपट ‘गीता गोविंदम’ने तिला जगभरात ओळख मिळवून दिली. 2021 मध्ये प्रदर्शित पुष्पा या चित्रपटात काम केल्यावर रश्मिकाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. गुडबाय, मिशन मजनू या चित्रपटात ती दिसून आली. तर रश्मिका अलिकडेच प्रदर्शित अॅनिमल या गाजलेल्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.