ठाण्यात बापाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गुन्हा दाखल
बाप आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना ठाण्यात घडली आहे.आरोपी बापाने आपल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटना मे 2022 ची आहे. कुटुंब उत्तरप्रदेशातील गोंडा येथे राहत असताना आरोपीने झोपलेल्या आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केले. कोणालाही हे सांगितल्यावर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.
या प्रकरणाबाबत पत्नीने विचारपूस केली असता आरोपाने तिला मारहाण केली. नातेवाईकांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर आरोपीने हे सर्व खोटे असल्याचे सांगितले.
नंतर हे कुटुंब तीन महिन्यांपूर्वी ठाण्यातील शीळफाट्यावर वास्तव्यास आले असताना त्याने पुन्हा स्वतःच्या मुलीवर बलात्कार केला. रविवारी पीडित मुलीने पोलीस ठाण्यात जाऊन त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपीच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायदा आणि इतर आरोपांनुसार गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरु केला.
Edited By – Priya Dixit