रणवीर, आलिया अन् विक्की एकत्र
संजय लीला भन्साळींचा चित्रपट
संजय लीला भन्साळी या दिग्दर्शकाच्या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक आतुरतेने करत असतात. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला मिळालेल्या अपार यशानंतर आता संजय लीला भन्साळी हे नवा चित्रपट घेऊन येणार आहेत. या नव्या चित्रपटाचे नाव ‘लव्ह अॅड वॉर’ आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार आलिया भट्ट, रणवीर कपूर आणि विक्की कौशल हे एकत्र दिसून येणार आहेत.
संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. अखेर माझे स्वप्न खरे ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पोस्टरवर चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाची तारीख नमूद आहे. तसेच आलिया भट्ट, रणवीर कपूर आणि विक्की कौशलची स्वाक्षरी दिसून येत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी नाताळादरम्यान प्रदर्शित होणार आहे.
कलाकार म्हणून विक्की कौशल पहिल्यांदाच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात दिसून येणार आहे. तर आलिया भट्टने भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळविला आहे. रणवी कपूरने भन्साळी यांचा चित्रपट ‘सांवरिया’मधूनच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. अशा स्थितीत विक्की कौशलसाठी हा अत्यंत मोठा ब्रेक असल्याचे मानले जात आहे.
Home महत्वाची बातमी रणवीर, आलिया अन् विक्की एकत्र
रणवीर, आलिया अन् विक्की एकत्र
संजय लीला भन्साळींचा चित्रपट संजय लीला भन्साळी या दिग्दर्शकाच्या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक आतुरतेने करत असतात. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला मिळालेल्या अपार यशानंतर आता संजय लीला भन्साळी हे नवा चित्रपट घेऊन येणार आहेत. या नव्या चित्रपटाचे नाव ‘लव्ह अॅड वॉर’ आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार आलिया भट्ट, रणवीर कपूर आणि विक्की कौशल हे एकत्र दिसून […]