रणजीत कणबरकरना सलग दुसऱ्यावर्षी सुवर्णपदक

बेळगाव : बेंगळूर येथे टीसीएस वर्ल्ड 10 किलोमीटर धावण्याच्या वरिष्ठांच्या धावण्याच्या स्पर्धेत बेळगावच्या रणजीत कणबरकर यांनी 38.28 इतक्या वेळेत पूर्ण करून दुसऱ्यांदा या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावित बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. बेंगळूर येथे टीसीएस 50 ते 54 वयोगटासाठी 10 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत बेळगावच्या रणजीत कणबरकर यांनी भाग घेऊन ही स्पर्धा 38.28 इतक्या मिनिटात पूर्ण करून […]

रणजीत कणबरकरना सलग दुसऱ्यावर्षी सुवर्णपदक

बेळगाव : बेंगळूर येथे टीसीएस वर्ल्ड 10 किलोमीटर धावण्याच्या वरिष्ठांच्या धावण्याच्या स्पर्धेत बेळगावच्या रणजीत कणबरकर यांनी 38.28 इतक्या वेळेत पूर्ण करून दुसऱ्यांदा या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावित बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. बेंगळूर येथे टीसीएस 50 ते 54 वयोगटासाठी 10 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत बेळगावच्या रणजीत कणबरकर यांनी भाग घेऊन ही स्पर्धा 38.28 इतक्या मिनिटात पूर्ण करून प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळविले. अनिल टोकरीने 40.06 इतक्या वेळेत पूर्ण करून रौप्यपदक, ताची जाकीमीने 40.33 इतका वेळेत पूर्ण करून कास्यपदक, स्मारण आझाद यांनी 40.35 इतका वेळेत पूर्ण करून चौथा क्रमांक तर व्यंकटेश अधिकाने 40.46 इतका वेळेत पूर्ण करून पाचवा क्रमांक पटकाविला. रणजीत कणबरकर हे बेळगावचे नामांकीत धावपटू असून ते कल्लेहोळ येथील सरकारी शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गतवर्षीसुद्धा रणजीत कणबरकरनी या स्पर्धेत भाग घेऊन सुवर्णपदक पटकाविले होते. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.