Ranbir Kapoor : अंबानीच्या लग्नात अभिनेता रणबीर कपूरचा भारी थाट; हातात घातले होते ६ कोटी रुपये किमतीचे घड्याळ!
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचं कौतुक अद्यापही थांबलेलं दिसत नाही. अभिनेता रणबीर कपूर आणि पत्नी आलिया भट्टची जोडी या लग्नात सहभागी झाले होते. यावेळी रणबीर कपूरने तब्बल ६ कोटी रुपये किमतीचे पॅटेक फिलिप लक्झरी घड्याळ घातले होते.