अयोध्यानगरी राममय
भक्तीमय वातावरणात रामलल्लाचा मंदिर परिसर प्रवेश : यजमानांनी केली विशेष प्रार्थना
वृत्तसंस्था/ अयोध्या
अनुष्ठान विधींना प्रारंभ झाल्यानंतर आता अयोध्यानगरी राममय झाली आहे. येथे दाखल झालेल्या प्रत्येक भक्तामध्ये आणि स्थानिक रहिवाशांमध्ये उत्साह दिसून येत आहे. संपूर्ण शहराची सजावट केल्याने अयोध्यानगर राममय बनली आहे. 22 रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी देशभरातून मोठ्या संख्येने लोक येथे पोहोचू लागले आहेत. अजूनही श्री रामजन्मभूमी ट्रस्टतर्फे विशेष निमंत्रितांना कार्यक्रमाची निमंत्रणे पाठवली जात असून मुख्य सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.
अनुष्ठान विधींनुसार बुधवारी भगवान रामलल्लाच्या मूर्तीने मंदिर परिसरात प्रवेश केला. या प्रवेशापुर्वी मुख्य यजमान अनिल मिश्रा यांनी सरयूच्या घाटावर विशेष प्रार्थना केली. यासोबतच गर्भगृहात विधीनुसार पूजाही करण्यात आली. मूर्तीच्या भव्य मिरवणुकीनंतर रामलल्लांनी मंदिर परिसर प्रवेश केला असून धार्मिक विधींमुळे मंदिर परिसरात उत्साही वातावरणाची निर्मिती झाली आहे.
22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन आणि अभिषेक कार्यक्रम होणार आहे. देशभरातील रामभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या कार्यक्रमापूर्वी मंगळवारपासून विधी सुरू झाले आहेत. हे अनुष्ठान विधी एकंदर सहा दिवस चालणार आहेत. यानंतर 22 जानेवारीला रामलल्लाचे रितसर सोहळ्यात प्राणप्रतिष्ठा पूजन होणार आहे. प्राणप्रतिष्ठापूर्व अनुष्ठानांचा कार्यक्रम प्राणप्रतिष्ठेच्या समयापर्यंत होणार आहे.
‘यजमान प्राय:श्चित्त’ सोहळा पूर्ण
अयोध्येत राममंदिर परिसरात ‘यजमान प्राय:श्चित्त’ सोहळा पूर्ण झाला आहे. या सोहळ्याला मुख्य आचार्य पंडित लक्ष्मीकांत दीक्षित उपस्थित होते. हा कार्यक्रम वैदिक पंडित आणि पुरोहितांच्या मार्गदर्शनात केला गेला. त्यानंतर बुधवारी तपश्चर्या पूजेनंतर रामलल्लाच्या मूर्तीने गर्भगृहात प्रवेश केला. रामलल्लाच्या प्रवेशापूर्वी सरयू नदीच्या पाण्याने गर्भगृहाचे शुद्धीकरण करण्यात आले. परमेश्वराच्या आसनाचीही पूजा करण्यात आली आहे. तत्पूर्वी रामलल्लाची मुख्य मूर्ती मंदिराभोवतीही फिरविण्यात आली.
पुढील चार दिवसही महत्त्वाचे
आता ‘जलयात्रा’ आणि ‘गंधाधिवास’ हे कार्यक्रम 18 जानेवारीला होतील. त्यानंतर 19 जानेवारीला ‘आयुष्याधाधिवास’, ‘केसराधिवास’, ‘घृताधिवास’ आणि ‘धान्याधिवास’ हे कार्यक्रम होतील. नंतर 20 जानेवारीला ‘शर्कराधिवास’, ‘फलाधिवास’ आणि ‘पुष्पाधिवास’ हे कार्यक्रम केले जातील. 21 जानेवारीला ‘मध्याधिवास’ आणि ‘शैलाधिवास’ झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठापूर्व अनुष्ठानांची सांगता होणार आहे.
Home महत्वाची बातमी अयोध्यानगरी राममय
अयोध्यानगरी राममय
भक्तीमय वातावरणात रामलल्लाचा मंदिर परिसर प्रवेश : यजमानांनी केली विशेष प्रार्थना वृत्तसंस्था/ अयोध्या अनुष्ठान विधींना प्रारंभ झाल्यानंतर आता अयोध्यानगरी राममय झाली आहे. येथे दाखल झालेल्या प्रत्येक भक्तामध्ये आणि स्थानिक रहिवाशांमध्ये उत्साह दिसून येत आहे. संपूर्ण शहराची सजावट केल्याने अयोध्यानगर राममय बनली आहे. 22 रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी देशभरातून मोठ्या संख्येने लोक येथे पोहोचू लागले आहेत. […]