रमित टंडन पराभूत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली इजिप्तमध्ये सुरू असलेल्या अल गोना आंतरराष्ट्रीय खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताचा स्क्वॅशपटू रमित टंडनचे आव्हान तिसऱ्या फेरीत समाप्त झाले. तिसऱ्या फेरीतील झालेल्या लढतीत पेरूच्या दियागो इलियासने टंडनचा 11-2, 11-4, 11-2 अशा सरळ गेम्समध्ये 35 मिनिटांच्या कालावधीत पराभव केला. पुढील वर्षीय इजिप्तमध्ये विश्व स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे. टंडनने या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत फ्रान्सच्या […]

रमित टंडन पराभूत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इजिप्तमध्ये सुरू असलेल्या अल गोना आंतरराष्ट्रीय खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताचा स्क्वॅशपटू रमित टंडनचे आव्हान तिसऱ्या फेरीत समाप्त झाले. तिसऱ्या फेरीतील झालेल्या लढतीत पेरूच्या दियागो इलियासने टंडनचा 11-2, 11-4, 11-2 अशा सरळ गेम्समध्ये 35 मिनिटांच्या कालावधीत पराभव केला. पुढील वर्षीय इजिप्तमध्ये विश्व स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे. टंडनने या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत फ्रान्सच्या व्हिक्टर क्रोइनचा तर सलामीच्या सामन्यात इजिप्तच्या अलि हुसेनचा पराभव केला होता.