रामदास कदम खानापूर न्यायालयात हजर
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीने खानापूर येथे 2006 साली सीमाप्रश्नासंदर्भात मेळावा घेतला होता. त्यावेळी महाराष्ट्रातील नेते मेळाव्याला उपस्थित होते. रामदास कदम यांनी कर्नाटक शासनावर भाषणातून हल्लाबोल केला होता. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची सुनावणी खानापूर न्यायालयात सुरू असून गुरुवार दि. 29 रोजीच्या सुनावणीला रामदास कदम आपले वकील शामसुंदर पत्तार, हेमराज बेंच्चन्नावर यांच्यासह खानापूर न्यायालयात हजर राहिले. न्यायालयाने त्यांना दि. 10 जून रोजी हजर होण्याचे आदेश बजावले आहेत. यावेळी यशवंत बिरजे यांसह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी रामदास कदम खानापूर न्यायालयात हजर
रामदास कदम खानापूर न्यायालयात हजर
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीने खानापूर येथे 2006 साली सीमाप्रश्नासंदर्भात मेळावा घेतला होता. त्यावेळी महाराष्ट्रातील नेते मेळाव्याला उपस्थित होते. रामदास कदम यांनी कर्नाटक शासनावर भाषणातून हल्लाबोल केला होता. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची सुनावणी खानापूर न्यायालयात सुरू असून गुरुवार दि. 29 रोजीच्या सुनावणीला रामदास कदम आपले […]