काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर प्रचारार्थ ऑटो रिक्षाचालकांची रॅली

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी आपले चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारासाठी बेळगावात ऑटोरिक्षा रॅली काढली. रॅलीच्या माध्यमातून मृणाल यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. ऑटो रिक्षाचालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आम्ही कोणी हुबळीला जाणार नाही, आम्ही इथेच राहतो. त्यामुळे स्थानिक उमेदवारालाच आमचा पाठिंबा आहे, असे ऑटो […]

काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर प्रचारार्थ ऑटो रिक्षाचालकांची रॅली

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी आपले चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारासाठी बेळगावात ऑटोरिक्षा रॅली काढली. रॅलीच्या माध्यमातून मृणाल यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. ऑटो रिक्षाचालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आम्ही कोणी हुबळीला जाणार नाही, आम्ही इथेच राहतो. त्यामुळे स्थानिक उमेदवारालाच आमचा पाठिंबा आहे, असे ऑटो रिक्षाचालकांनी सांगितले. टिळक चौक, रामदेव हॉटेल, चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, चित्रा थिएटर रोड, गणेशपूर परिसरातील ऑटोरिक्षा स्टँडला लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मृणाल यांच्यासाठी मतयाचना केली. मृणाल स्थानिक युवक आहे. काम करण्याचा त्याच्यात उत्साह आहे. बेळगावात राहूनच यापुढे तो काम करणार आहे. निवडणूक झाल्यानंतरही सहजपणे तो तुम्हाला भेटू शकतो. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारालाच मतदान करा. आम्ही सारे बेळगावचा विकास करू, अशी त्यांनी मतदारांना भावनिक साद घातली. आमचा पाठिंबा तुम्हालाच आहे, असे रिक्षाचालकांनी त्यांना सांगितले. काँग्रेसच्या गॅरंटी योजनांचे आपल्यावर ऋण आहे. निवडणुकीत आम्ही ते ऋण फेडणार, अशी ग्वाही ऑटो रिक्षाचालकांनी दिली. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह प्रमुख नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.