राजनाथ सिंह यांची प्रकृती बिघडली

एम्सच्या न्यूरो सर्जरी विभागात दाखल वृत्तसंस्था /नवी दिल्ली केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची प्रकृती गुरुवारी रात्री अचानक बिघडली. प्रकृती अस्वास्थ्यानंतर त्यांना एम्सच्या न्यूरो सर्जरी विभागात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाठदुखीच्या तक्रारीनंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत असले तरी संरक्षणमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत एम्सने अधिकृतपणे कोणतेही वक्तव्य […]

राजनाथ सिंह यांची प्रकृती बिघडली

एम्सच्या न्यूरो सर्जरी विभागात दाखल
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची प्रकृती गुरुवारी रात्री अचानक बिघडली. प्रकृती अस्वास्थ्यानंतर त्यांना एम्सच्या न्यूरो सर्जरी विभागात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाठदुखीच्या तक्रारीनंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत असले तरी संरक्षणमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत एम्सने अधिकृतपणे कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 10 जुलै 2024 रोजी आपला 73 वा वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी राजकीय नेत्यांसह निकटवर्तियांनी त्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले होते.