राजमुद्रा, बेळगाव बॉईज, दड्डी, अव्वल संघ विजयी

बेळगाव : साईराज स्पोर्टस् क्लब आयोजित नवव्या साईराज चषक अखिल भारतीय निमंत्रितांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनदिवशी राजमुद्रा मंडोळी, बेळगाव बॉईज, दड्डी स्पोर्टस् दड्डी व अव्वल स्पोर्टस् संघांनी आपल्या प्रतिस्पर्धांना पराभव करून विजयी सलामी दिली. वैभव पाटील, शाहीद, दिग्विजय पाटील, अलम माडीवाले यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सिन डेपो मैदानावरती आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख […]

राजमुद्रा, बेळगाव बॉईज, दड्डी, अव्वल संघ विजयी

बेळगाव : साईराज स्पोर्टस् क्लब आयोजित नवव्या साईराज चषक अखिल भारतीय निमंत्रितांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनदिवशी राजमुद्रा मंडोळी, बेळगाव बॉईज, दड्डी स्पोर्टस् दड्डी व अव्वल स्पोर्टस् संघांनी आपल्या प्रतिस्पर्धांना पराभव करून विजयी सलामी दिली. वैभव पाटील, शाहीद, दिग्विजय पाटील, अलम माडीवाले यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सिन डेपो मैदानावरती आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अनिल बेनके, उद्योगपती मल्लिकार्जुन जगजंपी, देवरथ जगजंपी, दिलीप पोरवाल, नारायण फगरे, महेश फगरे, गजानन फगरे, रोहित फगरे, अरुण कांबळे, आप्पाजी दळवी, अमर सरदेसाई, विजय धामणेकर व वल्लभ कदम, अमर नाईक, किरण पाटील, विक्रम देसाई, विनायक देवन, ए. बी. शिंत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सामन्यांना प्रारंभ करण्यात आला. पहिल्या सामन्यात राजमुद्रा मंडोळीने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 103 धावा केल्या. त्यात वैभव पाटीलने 4 षटकार, 2 चौकारसह 47, विकी पाटीलने 17 धावा केल्या. आरसी क्लबतर्फे अमन व लक्ष यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रतिउत्तरादाखल खेळताना आरसी क्लबने 8 षटकात 8 गडी बाद 75 धावा केल्या. त्यात मुत्तूने 6 षटकारासह 42, मुद्दसरने 26 धावा केल्या.
मंडोळीतर्फे शंकरने 3 तर वैभवने 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात रहान स्पोर्टने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 41 धावा केल्या. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. बेळगाव बॉईजतर्फे साहेब एमने 3 तर मानस व मिराज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रतिउत्तरादाखल खेळताना बेळगाव बॉईजने 3 षटकात 1 गडी बाद 43 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात बप्पाने 3 षटकार 3 चौकारसह नाबाद 37 धावा केल्या. अहनतर्फे झेनने 1 गडी बाद केला. तिसऱ्या सामन्यात दड्डी स्पोर्टसने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 72 धावा केल्या. त्यात दिग्विजय पाटीलने 3 षटकारसह 24 तर अजिंक्यने 19 धावा केल्या. युनायटेड बालाजीतर्फे उमेशने 3 तर अजिने 2 गडी बाद केले. प्रतिउत्तरादाखल खेळताना युनायटेड बालाजीने 8 षटकात 5 गडी बाद 65 धावा केल्या. त्यात दत्ता पाटीलने 19 तर राहुल पाटीलने 15 धावा केल्या. द•ाrतर्फे अजितने 2 तर दिग्विजय व अजिंक्य यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. चौथ्या सामन्यात आयसीसी अनगोळने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडी बाद 82 धावा केल्या. त्यात माझने 3 षटकारासह 36, लला मादारने नाबाद 21 धावा केल्या. अव्वलतर्फे साकीब व उमर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रतिउत्तरादाखल खेळताना अव्वल स्पोर्टसने 7.3 षटकात 4 गडी बाद 86 धावा करून सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात अलिमने 4 षटकारासह 39 तर शेहबाजने 22 धावा केल्या. अनगोळतर्फे लल्लाने 2 तर अमितने 1 गडी बाद केला.
गुरुवारचे सामने

स्टार इलेव्हन वि. युवराज स्पोर्टस सकाळी 9 वाजता
शिवनेरी स्पोर्टस वि. नाद स्पोर्टस सकाळी 10 वाजता
बेळगाव वॉरियर्स वि. ग्रामीण स्पोर्टस कल्लेहोळ सकाळी 11 वाजता
एस. के. स्पोर्टस वि. विसीसी यांच्यात 12 वाजता
गोळीबार स्पोर्टस कणबर्गी वि. पॅरी स्पोर्टस यांच्यात 1 वाजता