मुंबई गुजरातशी जोडण्याचा कट सुरू असण्याचा राज ठाकरे यांचा भाजपवर आरोप
ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीच्या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाषण करत सत्ताधारी भाजपावर तीव्र शब्दांत टीका केली. मुंबई गुजरातशी जोडण्याचा कट सुरू असून त्याची सुरुवात झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
ALSO READ: महाराष्ट्रातील बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरितांची माहिती सार्वजनिक करण्याची काँग्रेसची मागणी
मुंबई महानगर पालिकाच्या निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार असून मनसे, ठाकरे गट व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने संयुक्त जाहीर सभा 11 जानेवरी रोजी घेतली. या सभेत राज ठाकरे यांनी भाजप पक्षावर मुंबईला गुजरातशी जोडण्याचा कट सुरु असण्याचा आरोप केला.
ALSO READ: मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन
ते म्हणाले, मुंबई थेट विकत घेऊ शकत नसल्याने जमीन खरेदी सुरु आहे. वाढवण बंदरालगत गुजरात असल्याने मुंबईला गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी आधी पालघर, वाढवण परिसराला ताब्यात घेणे सुरु आहे. असं करून मुंबई पर्यंत पोहोचण्याचा जोरदार प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.
ALSO READ: एमव्हीएच्या काळात त्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला, एसआयटीच्या अहवालातून असे दिसून आले आहे: फडणवीस
जाती जातींमध्ये भांडण लावण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे. सांगली, कोल्हापुरातील मराठी माणसांना मुंबईत घरे मिळत नसून उत्तर भारतीयांना नौकऱ्या दिल्या जात आहे. मराठी माणसाला बेसावध ठेवली जात असून आता मराठी माणसांना जाग होण्याची वेळ आली आहे.
महायुती सरकार मध्ये छगन भुजबळ, अजित पवार यांना तुरुंग झाली असून आज ते सत्तेत आहे. मुंबई महाराष्ट्राच्या ताब्यातून गेल्यावर तिचे झारखंड होण्यास वेळ लागणार नाही. असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
Edited By – Priya Dixit
