5 जुलैच्या मोर्च्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार: संजय राऊत

 शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी ठाकरे बंधूंचा एक एकत्र फोटो शेअर करत एकच मोर्चा निघणार असल्याची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि राज ठाकरे (raj thackeray यांचा एक एकत्र फोटो ट्विट केला आहे. महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, असं त्यांनी म्हटलं आहे.दरम्यान, राज्य सरकारच्या हिंदीसक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एल्गार पुकारला आहे. मुंबईत येत्या 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावर मोर्चा (protest) काढण्यात येणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत (mumbai) पत्रकार परिषदेत केली. ‘या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल तर केवळ मराठीचा अजेंडा असेल. मराठीवर महाराष्ट्रावर (maharashtra) प्रेम करणा-या सगळयांनी या मोर्चात सहभागी व्हावे,’ असे आवाहन राज यांनी केले. दरम्यान, या आंदोलनात शिवसेना उबाठाने सहभागी होण्याकरिता मी उद्धव ठाकरेंशी बोलणार असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (dadaji bhuse) यांनी माझ्याशी चर्चा केल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘दादा भुसे यांच्याकडे काही प्रश्नांची उत्तरे नव्हती. ‘गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानदरम्यानच्या या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल. तो मोर्चा मराठी माणसाचा असेल, मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूसच करेल. शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, साहित्यिक यांच्याशी मी बोलणार आहे. माझे पत्र जाणार आहे. सर्व पालक विद्यार्थी यांना आमंत्रण देत आहोत. सरकारला कळू देत महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते, विद्यार्थी पालकांना यायला जमावे म्हणून हा दिवस निवडला आहे,’ असे राज ठाकरे म्हणाले. ‘महाराष्ट्राचे मराठीपण घालविण्यासाठीचे सरकारचे कारस्थान उद्ध्वस्त करण्यासाठी सर्व मराठीजनांनी या मोर्चात सहभागी व्हावे,’ असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.हेही वाचा हिंदी सक्तीविरुद्ध राज ठाकरे 5 जुलैला उतरणार रस्त्यावर राज ठाकरे आणि दादा भुसेंची चर्चा फिसकटली

5 जुलैच्या मोर्च्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार: संजय राऊत

 शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी ठाकरे बंधूंचा एक एकत्र फोटो शेअर करत एकच मोर्चा निघणार असल्याची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि राज ठाकरे (raj thackeray यांचा एक एकत्र फोटो ट्विट केला आहे. महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, असं त्यांनी म्हटलं आहे.दरम्यान, राज्य सरकारच्या हिंदीसक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एल्गार पुकारला आहे. मुंबईत येत्या 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावर मोर्चा (protest) काढण्यात येणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत (mumbai) पत्रकार परिषदेत केली. ‘या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल तर केवळ मराठीचा अजेंडा असेल. मराठीवर महाराष्ट्रावर (maharashtra) प्रेम करणा-या सगळयांनी या मोर्चात सहभागी व्हावे,’ असे आवाहन राज यांनी केले. दरम्यान, या आंदोलनात शिवसेना उबाठाने सहभागी होण्याकरिता मी उद्धव ठाकरेंशी बोलणार असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (dadaji bhuse) यांनी माझ्याशी चर्चा केल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘दादा भुसे यांच्याकडे काही प्रश्नांची उत्तरे नव्हती.‘गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानदरम्यानच्या या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल. तो मोर्चा मराठी माणसाचा असेल, मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूसच करेल. शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, साहित्यिक यांच्याशी मी बोलणार आहे. माझे पत्र जाणार आहे. सर्व पालक विद्यार्थी यांना आमंत्रण देत आहोत. सरकारला कळू देत महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते, विद्यार्थी पालकांना यायला जमावे म्हणून हा दिवस निवडला आहे,’ असे राज ठाकरे म्हणाले. ‘महाराष्ट्राचे मराठीपण घालविण्यासाठीचे सरकारचे कारस्थान उद्ध्वस्त करण्यासाठी सर्व मराठीजनांनी या मोर्चात सहभागी व्हावे,’ असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.हेही वाचाहिंदी सक्तीविरुद्ध राज ठाकरे 5 जुलैला उतरणार रस्त्यावरराज ठाकरे आणि दादा भुसेंची चर्चा फिसकटली

Go to Source