पावसाची उसंत, 20 दिवसानंतर सूर्यदर्शन

पणजी : अखेर तब्बल वीस दिवसानंतर गोव्यात सोमवारी अल्पावधीसाठी का असेना, परंतु सूर्यदर्शन झाले. सलग 20 दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी थोडी उसंत घेतली आणि ढगांना थोडे बाजूला सरण्यास संधी मिळाली. तेवढ्यातच जनतेला सूर्यदर्शन होऊन थोडा दिलासा देखील मिळाला. मात्र सायंकाळी पुन्हा एकदा अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. तब्बल वीस दिवसानंतर पावसाने थोडीफार उसंत घेतल्यामुळे […]

पावसाची उसंत, 20 दिवसानंतर सूर्यदर्शन

पणजी : अखेर तब्बल वीस दिवसानंतर गोव्यात सोमवारी अल्पावधीसाठी का असेना, परंतु सूर्यदर्शन झाले. सलग 20 दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी थोडी उसंत घेतली आणि ढगांना थोडे बाजूला सरण्यास संधी मिळाली. तेवढ्यातच जनतेला सूर्यदर्शन होऊन थोडा दिलासा देखील मिळाला. मात्र सायंकाळी पुन्हा एकदा अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. तब्बल वीस दिवसानंतर पावसाने थोडीफार उसंत घेतल्यामुळे राज्यातील जनतेला सूर्यदर्शन झाले. पावसाने यावषी कहर केला. 50 दिवसांत 106 इंच पावसाची नोंद केली. गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक झाडे उन्मळून पडण्याच्या घटना या दीड महिन्यात घडल्या. यंदाच्या पावसाळी मौसमात आतापर्यंत सुमारे आठ जणांचे बळी गेले.
48 तासांत जोरदार पावसाचा अंदाज
पुढील 48 तासांत जोरदार पावसाचा इशारा देत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मात्र आता पुराचा धोका नाही. गेल्या 24 तासांत गोव्यात सर्वत्र 1.5 इंच पावसाची नोंद झाली व सरासरी 106 इंच पाऊस आतापर्यंत कोसळला.