चीनमध्ये पावसाचा कहर, भूस्खलनामुळे 21 लोक ढिगाऱ्याखाली गाडले,15 ठार
चीनमधील एका गावात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात एक घर कोसळले. यामध्ये एकाच कुटुंबातील 21 जणांचा अंत झाला. त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य चीनमधील हेंगयांग शहरातील युएलिन गावात पहाटे 8 वाजण्याच्या सुमारास अचानक पूर आल्याने भूस्खलन झाले. यामध्ये एका घराचा काही भाग कोसळून 21 लोक गाडले गेले. घटनास्थळी बचाव पथकाने ढिगाऱ्यातून15 जणांचे मृतदेह बाहेर काढले. तर सहा जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सुमारे 250 जवान बचाव कार्यात गुंतले आहेत.
कोहसेंग परिसरातच चक्रीवादळामुळे सर्वाधिक (259) लोक प्रभावित झाले आहेत. यानंतर ताइनानमध्ये 125 आणि ताइचुंगमध्ये 120 जण जखमी झाले. वादळामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. वादळाच्या प्रभावामुळे तैवानच्या पूर्व आणि दक्षिण भागात अजूनही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Edited by – Priya Dixit