कुरंदवाड, नृसिंहवाडी परिसरात गारांसह पाऊस! नागरीकांना दिलासा

कुरुंदवाड प्रतिनिधी ढगांच्या गडगडाटासह कुरुंदवाड, नृसिंहवाडी परिसरात दुपारी चारच्या दरम्यान मुसळधार पावसाची हजेरी सुमारे दीड तास जोरदार पावसाने या परिसराला चांगले झोडपून काढले. यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसापासून या परिसरात दुपारच्या वेळी सूर्य चांगलीच आग ओकत होता या भागातील पारा ४० अंशावर पोहोचला होता. यामुळे […]

कुरंदवाड, नृसिंहवाडी परिसरात गारांसह पाऊस! नागरीकांना दिलासा

कुरुंदवाड प्रतिनिधी

ढगांच्या गडगडाटासह कुरुंदवाड, नृसिंहवाडी परिसरात दुपारी चारच्या दरम्यान मुसळधार पावसाची हजेरी सुमारे दीड तास जोरदार पावसाने या परिसराला चांगले झोडपून काढले. यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसापासून या परिसरात दुपारच्या वेळी सूर्य चांगलीच आग ओकत होता या भागातील पारा ४० अंशावर पोहोचला होता. यामुळे उकाड्याने नागरिक चांगलेच हैरण झाले. कधी एकदा वळवाचा पाऊस पडतो व काही प्रमाणात दिलासा मिळतो अशी आशा येथील नागरिकांना लागून राहिली होती. अखेर बुधवारी दुपारी ४ च्या दरम्यान अचानक आकाशात ढग जमून ढगांचा गडगडाट सुरू झाला व जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड तास पावसाने चांगलेच या परिसराला झोडपून काढले त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले. गावातील गटारी पाणी भरून वाहू लागल्या तर गेल्या काही दिवसापासून उष्णतेने कहर केलेल्या या परिसराला या मुसळधार पावसामुळे काही प्रमाणात हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.
दरम्यान, उन्हाच्या तडाख्यामुळे शेतातील पिके करपू लागली होती मात्र आज झालेल्या या धुवाधार पावसामुळे काही प्रमाणात या पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. चैत्र पालवी फुटलेल्या अनेक झाडांना आज पडलेल्या या पावसामुळे झाडांच्या मुळांना पाणी मिळाल्याने काही प्रमाणात चैत्र पालखीला फुटण्यास चांगले पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून या परिसरातील तापमान चांगले तापल्याने उष्माघाताचा त्रास सर्व नागरिकांना जाणवू लागला होता. मात्र आजच्या पाऊसाने हवेत गारवा निर्माण होऊन या सर्वांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.