येत्या 48 तासांत राज्यातील या भागात पाऊस कोसळणार!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून अंदमान निकोबार मध्ये दाखल झालेला मान्सून आता पुढे हळूहळू सरकत असून लवकरच केरळ मध्ये दाखल होणार आहे. अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. येत्या 48 तासांत केरळ मध्ये मान्सून धडक देणार आहे. या पार्शवभूमीवर राज्यातील …

येत्या 48 तासांत राज्यातील या भागात पाऊस कोसळणार!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून अंदमान निकोबार मध्ये दाखल झालेला मान्सून आता पुढे हळूहळू सरकत असून लवकरच केरळ मध्ये दाखल होणार आहे. अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. येत्या 48 तासांत केरळ मध्ये मान्सून धडक देणार आहे. या पार्शवभूमीवर राज्यातील काही भागात पाऊस कोसळणार आहे. 

 

शेतकऱ्यांनी त्या पूर्वी पेरणीची कामे पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे. यंदा उन्हाचा पारा चढल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असून पाणी टंचाईला समोरी जावे लागत आहे. 

यंदा मान्सून केरळ मध्ये लवकर दाखल झाल्याने महाराष्ट्रात यंदा जास्त पावसाची आशा आहे. 

आज आणि उद्या मुंबई उपनगर, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 

केरळात मे महिन्याच्या शेवटी मान्सून दाखल होणार असून महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 

 

 

Edited by – Priya Dixit 

 

 

Go to Source