बळिराजाने साधला पेरणीचा हंगाम
रविवारी शिवारात धांदल : ट्रॅक्टर-बैलजोडी-मनुष्यबळाचे साहाय्य
बेळगाव : वळिवाच्या पावसाने चांगली साथ दिल्याने बेळगाव परिसरात पेरणीला सुरुवात झाली आहे. मशागतीचे काम पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर पेरणीला सुरुवात केली. त्यामुळे बियाणांची जमवाजमव तसेच पेरणीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. त्यातच रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने शिवारांमध्ये नागरिकांची वर्दळ दिसून आली. बेळगावसह परिसरामध्ये मे महिन्याच्या अखेरीला पेरणी केली जाते. मागील आठवड्यात बेळगावसह परिसरामध्ये वळिवाने चांगली साथ दिली. यावर्षी सतत वळिवाचा पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना धूळवाफ पेरणी करता आली नाही. मशागतीची कामे पूर्ण झाल्याबरोबरच वळिवाला सुरुवात झाल्याने काही ठिकाणी ट्रॅक्टर तर काही ठिकाणी बैलजोड्या व माणसांच्या साहाय्याने पेरणीचे काम सुरू करण्यात आले आहे. विशेषत: वडगाव, अनगोळ, जुने बेळगाव, शहापूर शिवारात बासमती तसेच इतर भाताची पेरणी केली जाते. मागील पंधरा दिवसांपासून शिवारांमध्ये मशागतीची कामे सुरू होती.
बैलजोड्यांची संख्या झाली कमी
सध्या बैलजोड्यांची संख्या कमी झाल्यामुळे ट्रॅक्टरनेच मशागत करण्यात आली. कुळवणी करून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी केली होती. मागील आठवड्याभरात वळिवाचा समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे पेरणीच्या कामाला वाट मोकळी झाली.
रविवारी पेरणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ
रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने पेरणी करणाऱ्यांची संख्या वाढली होती. शिवारांमध्ये पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. रविवारी सकाळी ढगाळ वातावरण असले तरी त्यानंतर पडलेल्या उन्हामुळे पेरणी करण्याचे काम सोयीस्कर झाले.
Home महत्वाची बातमी बळिराजाने साधला पेरणीचा हंगाम
बळिराजाने साधला पेरणीचा हंगाम
रविवारी शिवारात धांदल : ट्रॅक्टर-बैलजोडी-मनुष्यबळाचे साहाय्य बेळगाव : वळिवाच्या पावसाने चांगली साथ दिल्याने बेळगाव परिसरात पेरणीला सुरुवात झाली आहे. मशागतीचे काम पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर पेरणीला सुरुवात केली. त्यामुळे बियाणांची जमवाजमव तसेच पेरणीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. त्यातच रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने शिवारांमध्ये नागरिकांची वर्दळ दिसून आली. बेळगावसह परिसरामध्ये मे […]